जालना (प्रतिनिधी) : पुर्व सूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडीत करून सरकार शेतकर्यांच्या जीवाशी खेळत असून वीज पुरवठा खंडीत करण्याचा करण्याचा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा अभियंता कैलास हुमने विज वितरण कार्यालय, जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. जालना जिल्ह्यामध्ये शेतकर्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.
शेतकर्यावर नैसर्गिक संकट, अतिवृष्टी, कोविड-19 मुळे शेतकरी आर्थिक संकटातून कसेबसे सावरत आहे. त्यात विद्युत मंडळाने वीज पुरवठा खंडित करण्याचे संकट उभे केले आहे. सध्या शेतकर्यांच्या रब्बी हंगामातील गहू हरभरा व इतर पिके वीज पुरवठा खंडित केल्यामुळे हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या जालना जिल्ह्यातील जास्तीच्या पावसामुळे शेतकर्यांची पिके वाया गेली असून शेतकर्यांवरील आर्थिक संकटाचा विचार करून शेतकर्यांची कृषी पंपाची वीज कनेक्शन कट करू नये, ज्या शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट केले आहे अशा शेतकर्यांचा वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा. जनावरांची पाणी पिण्याची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी. कापूस, मुग व मका पिकाचे उत्पादन 50 टक्के ही शेतकर्यांच्या हातात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका अन्यथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करू असा ईशारा देखील निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश आदमाने, जिल्हा महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्र आप्पा खरात, जिल्हाध्यक्ष कामगार सुरेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष समाधान खरात, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव आंभोरे, जिल्हासहसचिव नवनाथ ठोके, जिल्हा सचिव भानुदास साळवे, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, जिल्हा कार्यकर्ता दादाराव काकडे, महिला जिल्हाध्यक्ष कमलबाई जोगदंड, जिल्हा सचिव अॅड. अशोक वाहुळकर, जिल्हा सहसचिव अॅड. मदन पंडीत, महिला जिल्हा संघटक मथुराबाई मोरे, महिला जिल्हा सचिव कांताबाई बोरूडे, महिला जिल्हाउपाध्यक्ष शोभाबाई म्हस्के, जिल्हा सह संघटक मधुकर म्हस्के, संघटक संताराम शिंदे, अर्जुन म्हस्के आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
पुढील आठ दिवस मुदत : जिल्हा अभियंता कैलास हुमने
जिल्हा अभियंता कैलास हुमने विज वितरण कार्यालय, जालना यांची आज दि. 16 रोजी दुपारी 1 वाजता भेट घेवून अचानक वीज पुरवठा खंडीत केली असल्याबाबतची चर्चा जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर आणि पदाधिकारी यांनी केली असता त्यांनी सांगीतले की, शेतकर्यांसाठी पुढील आठ दिवसाची मुदत वाढ देऊ परंतू शेतकर्यांनी या आठ दिवसामध्ये बिल भरावे.
Leave a Reply