ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सातारा यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

July 27, 202114:34 PM 11 0 0

सातारा : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सातारा शाखेच्या वतीने SC ST OBC चे संविधानिक प्रतिनिधित्व आरक्षण आणि हक्क अधिकार संपविणाऱ्या 7 मे 2021 चे धोरणाच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष वामनजी मेश्राम साहेबांचे आदेशानुसार राज्यसचिव मा प्रा डॉ अर्जुन ओहळ यांचे मार्गदर्शन व जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त चार चरणात आंदोलन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितले.


भारतीय घटनेचे कलम 16/4 नुसार *प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलन . आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 358 तालुके एकाच वेळी चरण बद्ध राज्यस्तरीय आंदोलन दिनांक 26 जून 2021 ते 26 जुलै 2021पर्यंत करण्यात आले होते. आज सोमवार दिनांक 26 जुलै 2021रोजी विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन व पुष्पहार अर्पण करून बहुजन आक्रोश मोर्चा सुरू करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील तहसीलदार श्री. भुसे साहेब फौजदारी शाखा यांना निवेदन देताना भारतीय घटनेच्या कलम 16/4 नुसार आरक्षणाचा मूलभूत हक्कअधिकार कायम अबाधित ठेवला नाही तर राज्यच नव्हे तर देशभर सहयोगी संघटनांना सोबत घेऊन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघामार्फत तीव्र जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले, यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. डॉ. अर्जुन ओहळ, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे सर, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महासचिव सचिन विजय शिंदे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे असंघटित कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब एकनाथ काळोखे, बामसेफचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नितनवरे, भारतीय बेरोजगार मोर्चा तथा अ का संघाचे जिल्हाध्यक्ष रफिक मुलानी, लहुजी क्रांती मोर्चा माण तालुकाध्यक्ष सर्जेराव बाळू कांबळे, एसटी कामगार सेवानिवृत्त संघाचे महादेव रावसाहेब मोरे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटान चे राजेश शिंगाडे सर, मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सातारा तालुका संयोजक उत्तम सावंत, आदिवासी विद्यार्थी मोर्चा जिल्हा संयोजक ऍड.आशुतोष स. अ. शिंदे, RMBKS सातारा तालुका प्रभारी रवींद्र भोसले सर, RMBKS- प्रोटान चे जिल्हाप्रभारी सतिश गायकवाड सर, व इतर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *