ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रिबेल फ्रेंन्डस क्लब च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

October 27, 202114:50 PM 69 0 0

जालना : शहरातील छत्रपती संभाजी नगर प्रभाग क्रमांक १ येथील ओम शांती कडून आहिल्यादेवी होळकर हॉलकडे जाणारा रस्ता , भूमीगत गटार व सारनाथ बुद्ध विहार ते ओम शांती रस्ता व भूमीगत गटार बनविण्याची मागणी रिबेल फ्रेंन्डस क्लब च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.


शहरातील छत्रपती संभाजी नगर प्रभाग क्रमांक १ येथील ओम शांती ते आहिल्यादेवी होळकर जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी साचले आहेत त्या साचलेल्या पाण्यामूळे डासांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे येथे ताप , डेंग्यू सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . त्यामुळे वरील ठिकाणी लवकरात लवकर रस्ता व भूमीगत गटार बांधण्यात यावे . आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करू असे निवेदन रिबेल फ्रेंन्डस क्लब च्या वतीने जिल्हाधिकारी व नगर पालिका यांना देण्यात आले यावेळी किरण रवि साळवे ( रिबेल ) , आकाश अर्सुड , प्रमोद कांबळे , आकाश नखलव , सचिन मोकळे , शिवदास रन्नवरे , अजय नवगीरे , गजानन आंभोरे , कांतीलाल मोकळे , विनोद कांबळे , सोमनाथ सहाने पाटील , अजय साबळे , उमेश साळवे , नितिन खंदारे , राजू पवार , विजय जाटवे , नितिन शेंबेकर , गणेश गाडगे व आदींची उपस्थिती होती .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *