जालना (प्रतिनिधी) केंद्र सरकारने केलेल्या कायदे रद्द करावे ह्या मागणीसाठी देशभरातील विविध संघटना एकवटल्या आहेत या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष,संघटनाने पाठींबा दिला आहे याच पार्श्वभूमीवर घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मार्केट बंद ठेऊन अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला यावेळीं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस, एम आय एम,वंचित बहुजन आघाडी,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी अंबड पाथरी अर्धा तास रास्ता रोको करून मागणीचे निवेदन मंडळ अधिकारी एस एस बोटूळे यांना देण्यात आले.
आंदोलनात भाकपचे गोविंद आर्दड, वंचितचे विजयानंद शेळके,दिलीप राऊत, कॉग्रेसचे विष्णूपंत कंटूले,
स्वाभिमान शेतकरी चे देवकाजी तायडे,परमेश्वर खरात, जनार्धन भोरे, एम आय एम चे गुफारान फारुकी, रघुनाथ ताठे,शे अली शबीर ,किशन सोंळके,राहुल शिंदे, कुलदीप आर्दड, श्रावण तौर ,राष्ट्रवादी चे रामेश्वर लोया, अजिमखाँ पठाण ,दगडू आर्दड, दिगंबर भोरे,भागवत गोरे, यांची उपस्थिती होती.अदोलनकर्ते एवढेच पोलीस यावेळी उपस्थित होते.पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी उपस्थित होता.
Leave a Reply