ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्यातील टोलनाक्यावरील गुंडगिरी थांबवा ,बळीराजाची मागणी

September 27, 202115:20 PM 8 0 0

सातारा, सातारा जिल्ह्यातील खेड शिवापुर, आणेवाडी ,तासवडे आणि किणी येथील टोलनाक्यावरील गुंडगीरी थांबवावी या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी दिली.


मुल्ला म्हणाले, जिल्ह्यातील वर उल्लेख केलेल्या टोलनाका प्रशासनाच्या भोंगळ कारभार आणि गुंडगिरी तातडीने थांबवायली हवी.
सातारा जिल्ह्यात दोन टोलनाके आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी आहे. त्या पध्दतीने सातारा जिल्ह्यातील आनेवाडी तासवडे टोलनाक्यावर एमएच ११ आणि एमएच ५० पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी करावी. अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *