ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना शहरातील उघड्यावरील व नियमबाह्य मांस-मच्छली विक्री बंद करा नागरिकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

August 21, 202113:48 PM 7 0 0

जालना (प्रतिनिधी) :  जालना शहरात नुतन वसाहत, अंबड रोड, शासकिय रुग्णालय रोड, रेल्वे स्टेशन रोड, मंठा रोड, देऊळगाव राजा रोड व इतर अनेक ठिकाणी उघड्यावर व नियमबाहय मांस-मच्छली सर्रास विक्री चालु आहे. त्यामुळे नागरीकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्याचे दिवस असुन लोकांचे आरोग्य बिघडते, रोगराई पसरते, पर्यावरणास हाणी पोहचते, सुंदर व स्वच्छ जालना शहराच्या योजनेला बाधा येते, मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होते. महाराष्ट्र ही संताची भुमी आहे. संत महात्म्यांना देखील याचा त्रास होतो. लहाण मुलांच्या व नागरिकांच्या मनावर हिंसक परिणाम होतो. नागरिकांना नाक-तोड बंद करून चालावे लागते. सध्या देवांच्या पालखीचे व वारकऱ्यांचे पायी वाऱ्यांचे, चार्तुमाचे दिवस आहेत. शाकाहारी लोकांच्या भावना दुखावतात. शासनाने ठरवुन दिलेल्या पवित्र व सुट्यांच्या दिवशी देखील उघड्यावरील मांस-मच्छली विक्री सर्रास चालुच राहते. असे निवेदन जालना शहरातील नागरिकांच्या वतिने, पंचावन्न नागरिकांच्या स्वाक्षरी सह धनराज जैन, सुभाष वायकोस, अँड. ऋषभचंंद माद्रप, भरत परितकर, संजय ढोले, सौ. शीला वायकोस, प्रभाकर ढोले, अनुप डोनगांकर, समीप संगई, गंगाधर थोटे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *