ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निष्पापांचे अपघाती मृत्यू थांबवा। तात्काळ उपाय योजना करण्याची गरज

June 17, 202112:35 PM 12 0 0

जालना ( प्रतिनिधी) : भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी अंबड चौफुली वर तात्काळ उपाय योजना कराव्यात .अशी मागणी नागसेन ग्रंथालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश राऊत यांनी केली आहे.

यासंदर्भात बुधवारी ( ता. १६) राजेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, गतिरोधका अभावी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांकडून अंबड चौफुली जवळ दररोज अपघात होत असून निष्पाप लोकांचे बळी जात आहेत . ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासनाने चौफुली जवळ चारही बाजूंनी गतिरोधक बसवावेत, उंच लांब निर्देशक फलकावर पुढे चौफुली आहे असे ठळक नमूद करावे, औरंगाबाद – अंबड – मंठा चौफुली या मार्गावर जिल्ह्याची प्रमुख शासकीय कार्यालये, जिल्हा सामान्य रूग्णालय, तसेच खाजगी इस्पितळे असल्याने दररोज वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावर वाहनांची वेग मर्यादा तीस असावी, अंबड चौफुली जवळ चोवीस तास पहारा ठेवण्यात यावा, तसेच येथे सिग्नल सुरू करून रेडियम चे दिशादर्शक चिन्ह लावण्यात यावी,जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होतील शिवाय लुटमार, गुन्हेगारी सारख्या घटनांना ही आळा बसेल तरी तात्काळ उपाय योजना कराव्यात .अशी मागणी लेखी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राजेश राऊत, राजेंद्र ठोंबरे, गोरख खरात, महेंद्र जोगदंड, बबनराव रत्नपारखे, अरूण सरदार, प्रदीप मघाडे, महेंद्र रत्नपारखे, विनोद भगत, यशवंत राऊत, धीरज वाघ, रोहित कांबळे, समर्थ ओगले, वैभव वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *