ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 पत्नीचा गळा दाबून, तर एका वर्षांच्या चिमुकल्याची सुरीने हत्या; स्वतः घेतला गळफास

May 10, 202114:23 PM 62 0 0

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांना बसू लागला आहे. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे ही व्यक्ती पत्नी व मुलासोबत अनेक वर्षापासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण काम नसल्याने अनेक दिवसांपासून ते तणावात असायचे.
याबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले होते. पती हनुमंत शिंदे यांना समजून सांगण्याची विनंती त्यांनी नातेवाईकांकडे केली होती. पण, दुर्दैवी घटना घडलीच. दरम्यान ९ मे रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास तारखेला हनुमंत यांने पत्नी प्रज्ञाची गळा दाबून खून केला. तर एक वर्षाचा शिवतेज याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने हनुमंत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याचाही तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *