ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पक्ष संघटन मजबुत करुन शासनाच्या योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचवा- संपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर

August 11, 202121:42 PM 43 0 0

जालना, दि. १०(प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यात शिवसेनेने कोरोना काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्ष सातत्याने लोकांसमोर ठेवला व पक्षाची चांगली बांधणी करण्यात येत आहे. असे पक्ष संघटन मजबुत करुन शासनाच्या योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन संपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले.  शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आयोजित केलेल्या जालना व बदनापूर मेळाव्यात शिवसेना पदाधिकाNयांशी बोलतांना केले. या मेळाव्यात माजीमंत्री अर्जुनराव खोतकर,सहसंपर्वâप्रमुख शिवाजीराव चोथे, आमदार अंबादास दानवे,जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,ए.जे.बोराडे,माजी आमदार संतोष सांबरे, माजी जिल्हाप्रमुख
बाबासाहेब इंगळे,किसान सेनेचे भानुदास घुगे, युवासेनेचे भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, भगवान कदम, रावसाहेब राऊत, दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे,महिला आघाडीच्या सविता किवंडे, शहरप्रमुख विष्णु पाचपुâले,आत्मानंद भक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

शिवसंपर्वâ अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत जावून मोठ्या प्रमाणावर बैठकीचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हासंपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत विधानसभा निहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच मेळाव्यांना शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी मेळाव्यात पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधतांना संपर्वâप्रमुख घोसाळकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये राज्याचा गाडा सक्षमपणे हाकत आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून लोकांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. कोविड सारख्या परिस्थितीतही शेतकNयांना कोणत्याही जाचक अटी न घालता कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही राज्यात आर्थिक टंचाई असतांनाही  अगदी साध्या सरळ पध्दतीने दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमुक्ती दिली. विरोधकांच्या टिकांना उत्तरे न देता अत्यंत संयमाने सर्व परिस्थिती हातळली. त्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली असल्याचे सांगून घोसाळकर म्हणाले की, कोकणातील महापुरातही केवळ बघ्याची भुमिका न घेता प्रत्यक्ष भेटी देवून समस्या समजावून घेवून हजारो नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. पुढे घोसाळकर म्हणाले की, शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भुमिकेतून जालना जिल्ह्यातही जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून कोविड काळात भाजीपाला वाटप, किराणा किट, मास्क वाटप, कोविड योध्दांचा सन्मान, कोविडमुळे मृत पावलेल्या शेतकNयांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देणे असे अनेक उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांनी जिल्हाप्रमुखांचे कौतुक केले.
यावेळी बोलतांन माजीमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात जालना जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, नगर पंचायती या निवडणुका येवू घातल्या असून शिवसेना जिल्ह्यातील या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविल्या शिवाय राहणार नसल्याचे सांगितले. पुढे खोतकर म्हणाले की, कार्यकत्र्यांनी गाफील न राहता आपआपल्या स्तरावर आपले कार्य अत्यंत चांगल्या पध्दतीने करा,एकमेकांत समन्वय ठेवून काम करा, आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच आम्ही सज्ज असल्याचे खोतकरांनी शिवसैनिक व पदाधिकाNयांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, शिवसेना हा जनसामान्यांचा पक्ष असून तळागळातील शिवसैनिकांस न्याय देण्याचे काम पक्षाने नेहमीच केले आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात शिवसैनिकांनी घरात न बसता रस्त्यावर उतरुन जमेल तशी मदत केली. आज राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असल्याने शिवसैनिकांनी शासनाच्या सर्वच योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत नेवून त्याचा लाभ मिळवून द्यावा. तसेच आगामी काळात होणाNया सर्व निवडणुकांसाठी सज्ज राहून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्वच पदाधिकाNयांनी अत्यंत जबाबदारी कामे करावे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख अंबेकरांनी केले.
या मेळाव्यास उपस्थित सर्व पदाधिकाNयांना मार्गदर्शन करतांना सहसंपर्वâप्रमुख शिवाजीराव चोथे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार संतोष सांबरे यांनी कार्यकत्र्यांना आपआपल्या गावात शिवसेना पक्ष मजबुत करण्यासाठी जास्तीत-जास्त सदस्य नोंदणी, नवीन शाखांची रचना करुन पक्षाची ध्येयधोरणे सामान्यांपर्यंत नेवून गावागावात शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण करावी, असे आवाहन केले. बॉक्समध्ये घेणे जिल्हाप्रमुखांचे कौतुक शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर यांनी आपल्या घराच्या बांधकामातून पैसे वाचून कोविडमुळे मृत झालेल्या शेतकNयांच्या कुटूंबियांना मदत केली. त्याच प्रमाणे जिल्ह्यात शिवसेनेचे कार्पाेरेट दर्जाचे शिवसेना भवन उभे
केले त्याबद्दल संपर्वâप्रमुख घोसाळकर यांनी जिल्हाप्रमुखांचे कौतुक केले. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नाभिक समाजाचे रोजगार बंद होते. त्यांच्या ५१ पाल्यांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व
स्मृतीचिन्हाचे वितरण करण्यात आले. या मेळाव्यास तालुकाप्रमुख संतोष मोहिते, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, शहर संघटक दिपक रननवरे, जि.प. सदस्य बबनराव खरात, वैâलास चव्हाण, गणेश
डोळस, पंचायत समिती सभापती सुधीर पाखरे, भगवान शिंदे,माजी जि.प. सदस्य हरीहर शिंदे, माजी सभापती पांडूरंग डोंगरे,जनार्धन चौधरी, विभागप्रमुख प्रभाकर घडलिंग,गणेश शिंदे, काशीनाथ जाधव,सखाराम गिराम, गणेश मोहिते,मुरली थेटे, ब्रम्हा वाघ, उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, युवासेना शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले, नगरसेवक निखिल पगारे, अशोक पवार, किशोर पांगारकर, गणेश घुगे, गोपी गोगडे, संदीप नाईकवाडे, संतोष जांगडे, किशोर नरवडे, मनोज लाखोले, दिपक राठोड, चेतन भुरेवाल,नरेश खुदभैये,राजेश टेकुर, जगदीश रत्नपारखे, अनिल अंभोरे,लखण कनिसे,किशोर शिंदे, भरत कुसुदल,योगेश रत्नपारखे, भगवान अंभोरे,रवि जगधने, सर्जेराव शेवाळे, वैजीनाथ कावळे, नरेश कपुर,सोपान कावळे, हरी शेळके,अल्पसंख्याक आघाडीचे शेख जावेद,मुसा
परसुवाले, विजया चौधरी, राधा वाढेकर, आशा पवार,सिमा पवार,संगीता नागरगोजे,गंगा जाधव,सखाराल लंके,कांताराव रांजनकर,संतोष खरात,विठ्ठल खरात,रामचंद्र पुâलझाडे,रामेश्वर कुरिल,संतोष रासवे,संतोष जमधडे,वैâलास गिराम,विकास बोर्डे, दर्शन चौधरी यांच्यासह उपतालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *