जालना: महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाला नानासाहेब पटोले यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व लाभले असून महाराष्ट्र काॅग्रेसमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून कार्य करावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी आज ( ता. २७)येथे केले.
अंबड चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा. सत्संग मुंढे, राष्ट्रीय बंजारा टायगर संघटनेचे अध्यक्ष आत्माराम जाधव, भीमशक्तीचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, जालना तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत राजे जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जाधव पुढे म्हणाले की, नानासाहेब पटोले हे काॅग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यात काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. जर काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून कार्य केले तर महाराष्ट्र राज्यात काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना प्रा. सत्संग मुंढे यांनी कार्यकर्त्यांनी काॅग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी कार्य करावे, तसेच जनतेत जावून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. भीमशक्तीचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी काॅग्रेस पक्षाने उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका जतन केली असल्याचे सांगून पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांनाही न्याय द्यावा, आपण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आपण असंख्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना काॅग्रेस पक्षाच्या विचारधारेत आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आत्माराम जाधव, वसंत राजे जाधव, युवक काँग्रेसचे जालना तालुकाध्यक्ष अर्जुन घडलिंग आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी भीमशक्तीचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, प्रा. सत्संग मुंढे, काॅग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद लोखंडे, भीमशक्तीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास गंगातिवरे , जिल्हा काॅग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे आदींनी जाधव यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज राठोड यांनी केले केले. तर शाहीर राठोड यांनी आभार मानले.
यावेळी मंठा तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष निळकंठ वायाळ, अंजेभाऊ चव्हाण, काॅग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे जालना तालुकाध्यक्ष शेख शाहेद शाम राठोड, विजय राठोड, नितीन कानडे, फकीरा वाघ, अंकुश चव्हाण, दशरथ राठोड, सुभाष राठोड, भीमशक्तीचे जालना शहर कार्याध्यक्ष किशोर बोर्डे,,विक्रम चव्हाण , रघुवीर गुडे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply