ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये वाढता कोरोना आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध

December 29, 202119:18 PM 50 0 0

उरण :(संगिता पवार ) : ३१ डिसेंबर रोजी परतीचे आयोजन करू नये .३१ डिसेंबर रोजी रात्री ९ नंतर कुणीही एकत्र ( ५ पेक्षा ) व्यक्तींनी एकत्र येऊ नये .शासनाच्या २४ डिसेंबर रोजी च्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे .रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कडील २५ डिसेंबर रोजी च्या आदेशां चे पालन करावे . कुणीही विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल ,हळदी समारंभ कमीत -कमी व्यक्तींनी मध्ये करावे रात्रो ९ नंतर करू नये . कोरोना लसीकरणाचे दुसरा डोस घेणे बाकी असेल तर त्यांनी त्वरीत घाव्ये .सी एस एफ ,ओएनजिसी ,बीपीसीएल जेएनपीटी ओएनजिसी येथील अधिकारी ,अस्थापना ने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कोविड ऑप्रोप्रियेट बिव्हेहर ( C A B ) चे पालन करावे .नागरिकांनी ओमिक्रॉन च्या पार्श्व भूमीवर लग्न ,उत्सव ,समारंभ येथे नागरिकांनी जाण्याचे टाळावे .गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे अवाहन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे .

यक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या मदतीने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध पुन्हा कडक करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उरण तालुका प्रशासनही सज्ज झालंआहे. उरण तालुक्यात कुठेही फिरताना मास्क वापरावे आणि गर्दीचे कार्यक्रम
टाळण्याचे आवाहन उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे.
वर्ष अखेर आणि लग्नसराई ची सध्या धामधुम सूरू आहे. त्यामुळे कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणे गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना पसरण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी फिरताना मास्क वापरावा, सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असून त्यासाठी 10 ठिकाणी लसींची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
रात्री 9 ते सकाळी 6 वा. दरम्यान गर्दीचे कार्यक्रम टाळावे, पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना देण्यात आल्याआहेत. लग्न समारंभ रात्री 9 नंतर टाळावेत. ग्रामपंचायत आणि स्थानिक
स्वराज्य संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *