ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पात्र वयोगटातील प्रत्येक लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण होण्याच्यादृष्टीने काटेकोर नियोजन करा :  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

April 12, 202216:49 PM 46 0 0

जालना:- जालना जिल्ह्यामध्ये 12 ते 14 व 15 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण 100 टक्के पुर्ण होईल, यादृष्टीने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये लसीकरण सत्राचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी श्रीमती जयश्री भुसारे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, जालना जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील बालकांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 29 एप्रिलपर्यंत शाळा सुरु राहणार असुन त्यानंतर शाळांना उन्हाळी सुट्टया लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध कालावधीमध्ये शाळानिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात येऊन प्रत्येक पात्र बालकाला कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीचा डोस दिला जाईल, याची दक्षता घ्यावी. शाळांना सुट्टया लागल्यानंतर जी बालके डोसपासुन वंचित राहतील अशा बालकांना घरोघरी जाऊन लसीचा डोस देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे 15 ते 17 या वयोगटातील लाभार्थ्यांनाही लस देण्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. 18 व त्यावरील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा लाभार्थ्यांना लस टोचण्याबरोबरच जे लाभार्थी दुसऱ्या डोससाठी पात्र झालेले आहेत अशांना प्राधान्याने लसीचा डोस देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होण्यासाठी एकही तालुका लसीकरणामध्ये मागे राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *