ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पेट्रोल, डिझेल दरवाढिच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरूद्ध जालन्यात काँग्रेस पक्षाची जोरदार सायकल रॅली

July 18, 202111:53 AM 46 0 0

जालना (प्रतिनिधी) ः पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली भरमसाठ दरवाढ आणि जिवनावश्‍यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्य जनतेला जिवन जगणे कठिण झाले आहे. केंद्रातील भाजपा सरकार या दरवाढीस जबाबदार असून केंद्र शासनाच्या निषेधार्थ जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवार रोजी भव्य सायकल रॅली काढून दरवाढीविरूद्ध आंदोलन करण्यात आले. सायकल रॅलीच्या अग्रभागी असलेल्या बैलगाडीसह आंदोलनकर्त्यांनी जालनेकरांचे लक्ष वेधून घेतले.


केंद्रात सत्तेत येण्यापुर्वी अच्छे दिनचे गाजर दाखवत सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल करून सत्ता काबिज केल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचा केंद्रातील भाजपा सरकारला पुर्णपणे विसर पडला आहे. गेल्या वर्ष – दिड वर्षभरापासून महाराष्ट्रासह देशातील जनता करोनासारख्या महामारीमुळे मोठ्या आर्थीक संकटात सापडलेली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले असून हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस पुरता हतबल झालेला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेवून केंद्रातील भाजपा सरकारने जिवनावश्‍यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवणे गरजेचे असतांना केंद्र सरकार याकडे डोळेझाक करत आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या काही महिण्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचे परिणाम जिवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढण्यावर झाले आहे. इंधनाचे दर आटोक्यात ठेवले असते तर जिवनावश्‍यक वस्तूंचे दर देखील स्थिर राहिले असते. परंतू केंद्रातील भाजपा सरकार हे भांडवलदारांचे सरकार असून सर्वसामान्य जनतेच्या अडचणीशी या सरकारला काहीही घेणे देणे नाही. केंद्र सरकारच्या या बेजबाबदार कारभाराविरूद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरूद्ध राज्यभर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी शहरातील हुतात्मा जनार्धनमामा यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सायकल रॅली आंदोलनास जोरदार प्रारंभ करण्यात आला.
सदर रॅली महावीर चौक, सुभाष चौक, मुथा बिल्डींग, लोखंडी पुल, मस्तगड या मार्गे जावून गांधी चमन येथे राष्ट्रपिता महत्मागांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत सहभागी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दरवाढीसह कें रकारचद्रच्या विरोधात दिलेल्या गगनभेदी घोषणाबाजीमुळे जालनेकरांचे लक्ष वेधून घेतले. भाजपा सरकार हाय…हाय…, इंधन दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, जिवनावश्‍यक वस्तूंचे दर तात्काळ कमी करा इत्यादी घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
या रॅलीमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे, आर. आर. खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, प्रभाकर पवार, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, त्रींबकराव पाबळे, विठ्ठसिंग राजपुत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, शेख शमशु, सय्यद निजाम, चंद्रकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, शरद देशमुख, कृष्णा पडूळ, फकीरा वाघ, इरशाद कुरेशी, नगरसेवक रमेश गौरक्षक, महाविर ढक्का, शेख शकील, संजय भगत, बालकृष्ण कोताकोंडा, नारायण वाढेकर, नंदाताई पवार, सय्यद करीम बिल्डर, वसिम कादरी, अफसर चौधरी, अंकुश शेजुळ, मनोहर उघडे, सय्यद मुस्ताक, मुक्तारखान, शिवप्रसाद चितळकर, जावेदअली, विजय राठोड, बाबा गाढे, लक्ष्मण शिंदे, अरूण घडलिंग, अंकुश गायकवाड, ॲड. कामरान खान, नदीम पहेलवान, अनस चाऊस, संतोष भालेराव, रहिम तांबोळी, सिताराम तुपे, सोपान सपकाळ, इम्रान बिल्डर आदी पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. या सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *