ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीस ईडीने दिलेल्या नोटीसचा तीव्र निषेध, शिवसेनेची तीव्र निदर्शने, वेंâद्राच्या अखत्यारित येणाNया संस्थांचा गैरवापर त्वरीत थांबवा- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

December 28, 202021:33 PM 123 0 0

जालना  दि. २८(प्रतिनिधी)- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीवर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली. याचा जालना जिल्हा   शिवसेनेच्या वतीने भोकरदनाका परिसरातील चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरयांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करुन निदर्शने केली व वेंâद्र शासनाच्या अख्त्यारित असलेल्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग या शासकीय संस्थांचा गैरवापर त्वरीत थांबवा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. यावेळी  वेंâद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख आत्मानंद भक्त, विष्णु पाचपुâले, माजी नगरसेवक बाला परदेशी, नगरसेवक अशोक पवार, विजय पवार, निखिल पगारे, नितीन जांगडे, संदीप नाईकवाडे, गोपीकिशन गोगडे, दुर्गेश काठोठीवाले, दिपक रननवरे, अंकुश पाचपुâले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यापासून वेंâद्र शासन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वेंâद्र शासनाच्या आख्यत्यारित घटनात्मक संस्थांचा मोठ्या प्रमाणावर दुरपयोग करीत आहेत. ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा विविध संस्थांचा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सर्रास वापर केला जाता आहे. या सर्व संस्था सत्ताधारी कार्यकत्र्यांप्रमाणे कार्य करीत आहेत. देशात त्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. लोकशाही प्रणित हिंदुस्थाना सारख्या देशात कोणी विरोध केला की त्याची चौकशी लावायची. हा प्रकार लोकशाही संपून देशाला एकाधिकार शाहीकडे नेणारा आहे. हिंदुस्थानच्या घटनेत विरोध पक्षाचे महत्वाचे स्थान आहे. परंतु या विरोधी पक्षातील कार्यकत्र्ये व नेते सत्ताधारी वेंâद्राच्या धोरणाच्या व कार्यप्रणालीच्या विरोधात प्रश्न निर्माण केले त्यात राष्ट्रवादीचे प्रपुâल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक व संजय राऊत यांच्या पत्नी या सर्वांच्या विरोधात ईडीचा वापर केला जातो. राज्यातील सरकार हातून गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष सातत्याने महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी या संस्थांचा वापर करतांना दिसत आहे. ही बाब अत्यंत निंदनिय आहे. राज्यपालाच्या माध्यमातूनही सरकार अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात राजकारणासाठी मोठ्या प्रमाणावर वेंâद्रातील सत्तेचा गैरवापर होत असल्याने येथील जनता व्यथित झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतून वेंâद्र व राज्यातील भाजप नेत्यांच्या विरोधात जनतेने आपला कौल दिलेला आहे. यातून तरी आता वेंâद्र शासनाने व त्यांच्या नेत्यांनी काही बोध घ्यावा. घटनात्मक संस्थांचा होणारा दुरपयोग त्वरीत थांबवा, अशी मागणीही शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह कार्यकत्र्यानी केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले निर्णयकरीत आहे. राज्यातील शेतकNयांना दोन लक्ष रुपयांची कर्जमुक्ती कुठल्याही कागदपत्रांच्या पेâNयात न अडकवता दिली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई, कोविड-१९ सारख्या महासंकटात महाराष्ट्र सरकारने अतिशय
चांगले काम केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत महाराष्ट्र सरकार विषयी विश्वासाची भावना निर्माण झालेली आहे. या सरकारला वेंâद्र अख्त्यारिती
संस्थांचा गैरवापर करुन अस्थिर करु नका, नसता राज्यभरातील जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचे अंबेकर म्हणाले.यावेळी राजु घोडे, राजेंद्र परदेशी, राजु वैद्य, गौरव संत, राजेक कुरेशी, जान मोहमद कुरेशी, गणेश लाहोटी, अमोल कटारिया, राजु इंगळे, राम खांडेभराड, प्रशांत जगताप, शिवाजी मुळे, विकास क्षिरसागर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी वेंâद्र सरकार व र्इंडी सारख्या
संस्थांचा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करुन चिरफाड केली. या घोषणांनी भोकरदन नाका परिसर दणाणून गेला होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *