ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सोमवार रोजीच्या बदंला विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) ने सहभागी व्हावे : जावेद बेग

October 10, 202114:13 PM 3 0 0

जालना (प्रतिनिधी) ः उत्तर प्रदेश लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या पुत्राने निष्पाप शेतकऱ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना झाल्यानंतरही भाजपाच्या केंद्र सरकारने आरोपींना अटक केली नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर सोमवार रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी काँग्रेस एन. एस. यु. आय.च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जावेद बेग यांनी केले आहे.


उत्तर प्रदेश लखीमपूर येथे निष्पाप शेतकऱ्यांवर जीप चालवून त्यांना चिरडण्यात आले असून यामध्ये सात शेतकऱ्यांचा बळी गेला असून एका पत्रकाराचा देखील मृत्यू झालेला आहे. अशी भयानक दुर्दैवी घटना घडल्यानंतरही उत्तर प्रदेश योगी सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. देशातील शेतकऱ्यांविरूध्द ही अमानवी घटना पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही. परंतू योगी आणि मोदी सरकार या घटनेकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे. तरी सोमवार रोजी सकाळी 9 वाजता विद्यार्थी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मामा चौक येथे उपस्थित राहावे असे आवाहन विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जावेद बेग यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *