सतारा प्रतिनिधी,(विदया निकाळजे) हुतात्मा संकुलात व्याख्यानमाला संपन्न ता.खटाव, वडूज शिक्षण विकास मंडळ,वडूज या संस्थेच्या हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, महात्मा जोतिबा फुले प्राथ. शाळा व प्रेरणा शालेय पूर्व केंद्र या संपूर्ण संकुलाच्या वतीने विद्यार्थी गणेशोत्सव व्याख्यानमाला संपन्न झाली.
व्याख्यानमालेत बाहेरचे वक्ते निमंत्रित करण्याऐवजी आपल्याच संकुलातील शिक्षकांना वक्ता म्हणून संधी मिळावी ही संस्थेतील पदाधिकाऱ्यांची सूचना शिक्षकांनी स्वीकारली आणि कल्पनातीत वक्तृत्वाचे दर्शन सर्वांना झाले. या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प महात्मा जोतिबा फुले प्राथ. शाळेच्या उपशिक्षिका शितल शिंदे पवार यांनी गुंफले.त्यांचा विषय होता मनमोगरा-कविता मनातल्या.. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. विविध विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या कविता त्यांनी गोड आवाजात श्रोत्यांना ऐकवल्या. जीवनाला आकार देणाऱ्या, समाजभान जागवणाऱ्या, स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या, निसर्गाचे लोभस रूप दाखवणाऱ्या कविता श्रोत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरल्या. सर्वच कवितांना टाळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांवरील कविता,गड किल्ल्यांवरील कविता विशेष दाद मिळवून गेल्या. विडंबन काव्य प्रकार ऐकतांना श्रोत्यांमध्ये हास्य तरंग उठले. काव्य मैफिलीची सांगता करतांना वारी, गुरु तुम्हीच आधार.. या कवितांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमास वडूज शिक्षण विकास मंडळाचे डॉ.हेमंत पेठे, श्री.सतीश शेटे, श्री. नितीन जाधव,श्री. गोविंद भंडारे उपस्थित होते. डॉ.पेठे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात शितल शिंदे यांच्या स्वरचित कवितांचे भरभरून कौतुक केले व पुढील साहित्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सौ.नैना दौंड मॅडम,उप मुख्या.महेश गोडसे सर, पर्य. दिलीप फडतरे सर व भारती माने मॅडम,महात्मा जोतिबा फुले प्राथ.शाळेच्या मुख्या. सौ.सुनिता कुंभार मॅडम, सर्व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आशुतोष गवळी तर आभार सौ.मिनल देशपांडे यांनी मानले. श्री. अनिल माने सर यांनी मार्गदर्शन केले याच व्याख्यानमालेत श्री.महादेव भोकरे सर, विजय राऊत सर,किरण लोखंडे सर,किरण कांबळे सर, संतोष स्वामी सर यांचीही व्याख्याने झाली.
Leave a Reply