सातारा,(विदया सुरजकुमार निकाळजे) : जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी या शाळेतील शिक्षक श्री शिवाजी शिवणकर आणि सौ उषा शिवणकर हे सतत विविध प्रकारचे शालेय उपक्रम राबविण्यात तत्पर असतात.यावर्षीच्या दसरा सणाच्या निमित्ताने श्री व सौ शिवणकर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत झेंडूच्या फुलांचे हार बनविणे हा उपक्रम घेतला. नित्य नवनवीन उपक्रम राबविण्यात सावंतवाडी ही शाळा प्रसिद्ध आहे. जावळी चे गटशिक्षणाधिकारी श्री रमेश जी चव्हाण केंद्रप्रमुख श्री अरविंद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविले जातात, असे श्री शिवणकर यांनी सांगितले.
जावली तालुक्यातील सावंतवाडी ही शाळा गेल्या तीन वर्षा पासून नव नवीन उपक्रम राबविणारी शाळा म्हणून सातारा जिल्हात नावारूपाला आली आहे . सन २०१८ मध्ये या शाळेत सौ . उषा शिवणकर व श्री . शिवाजी शिवणकर हे दोघे पती पत्नी ऑनलाईन बदलीने एकत्र आले त्यावेळी माझी गटशिक्षणाधिकारी श्री . रमेशजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदशनाखाली शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली . शाळेत नाविण्य पूर्ण परसबाग तयार करून त्यामध्ये केळी पपई आळू बटाटा घेवडा कोथिंबीर मेथी या भाज्यांची निर्मिती केली . एप्रिल २०१९ रोजी शाळेतील सर्व मुलांना पोहण्यास शिकविले हा उपक्रम राबवत असताना कुडाळ या ठिकाणी असणाऱ्या विहिरी वरती नेहून शाळेत सर्व मुलांना पोहण्यास शिकविले जून २०१९ मध्ये शाळेत इयत्ता पाचवीचा नवीन वर्ग सुरु करून १००% मुले शिष्यवृती परीक्षेस बसविली सन २०१९ / २०२० मध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेणारी पहिली छोटी शाळा या मध्ये जावळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले त्यानंतर फेब्रुवारी २०२० पासून शाळा बंद असून ही आम्ही सतत मुलांच्या सपर्कात होतो आता कुठे शाळा सुरु झाल्या नंतर मुलांना पुन्हा एकदा शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी नवीन उपक्रम आम्ही निवडला कार्यानुभव कार्यशाळेतून मुलांना दसरा सणाचे औचित्य साधून फुलांचे हार बनविणे हा उपक्रम निवडला प्रथम मुलांना याबद्दल ची माहिती सांगितली मुलांचे पालक राजेंद्र सावंत व लिंबराज कराड यांनी शाळेत फुले आणून दिली तसेच झाडाची पाने सुद्धा आणून दिली नंतर मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली हार बनविले हार बनवित असताना मुलांना वेगळाच आनंद मिळत होता याच दरम्यान कुडाळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री . अरविद दळवी यांची भेट झाली मुलांनी बनविलेले हार देवून त्यांचे स्वागत केले शाळेमध्ये उपक्रम राबवत असताना आम्हाला शिक्षण विस्तार अधिकारी सौ . कल्पना तोडरमल मॅडम श्री चंद्रकांत कर्णे साहेब व आमच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती अरुणा यादव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे श्री शिवणकर गुरुजींनी सांगितले.
Leave a Reply