ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी वाचविले पाडसाचे प्राण

October 20, 202112:46 PM 11 0 0

जालना (अनिता पवार):  मौजे सारवाडी तालुका जिल्हा जालना येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक वन्यजीव छायाचित्रकार निसर्ग अभ्यासक प्राणीमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या विद्यार्थ्याने आणि पालकांनी वाचवले हरिणाच्या पाडसाचे प्राण.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथील विद्यार्थी अरुण जनार्धन काळे आणि करण जनार्धन काळे या दोघा भावंडांनी एका हरणाच्या पाडसाला कुत्र्याने पकडले असता त्याचा आवाज ऐकून तिकडे काही लोक धावले हेसुद्धा तिथपर्यंत गेले परंतु काही लोकांनी वन्यजीव कायद्याच्या भीतीने सदरील पाडसाला हात लावण्यास नकार दिला परंतु दोन्ही विद्यार्थी हे वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांचे विद्यार्थी असल्याने त्यांनी त्यांच्या सरपंच वडील जनार्दन काळे यांना कळवले त्यांनी त्या हरणाचे प्राण त्या कुत्र्याच्या तावडीतून वाचवले व त्या जखमी हरणाच्या पाडसा वर प्रथमोपचार करून तात्काळ आपल्या शिक्षकाना संपर्क केला त्यांनी देखील वन विभागाशी संपर्क साधून या जखमी पाडसाला स्वतः शिक्षक पालक विद्यार्थी यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले आणि त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.
शिक्षक ज्ञानेश्वर गिराम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी या ठिकाणी वाइल्डलाइफ क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारंवार माहिती दिलेली आहे आणि सदर चे विद्यार्थी प्राणी पशुपक्षी जखमी झाल्यास त्यांना तात्काळ मदत करतात त्यांच्यामध्ये भूतदया निर्माण करण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थ्यांच्या या कार्याचे गावातून कौतुक होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *