जालना/प्रतिनिधी जालना शहरातील गुंडांवर हद्दपार व एमपीडीए अंतर्गत भरीव कामगिरी तसेच गुन्हे निर्गतीसाठी सचोटी व कसोशीने प्रयत्न, मुद्देमाल निर्गती, रात्र गस्तीचे क्यू आर कोड संकल्पना व प्रत्यक्षात कार्यवाही, सीसीटीएनएस मध्ये भरीव कामगिरी ईत्यादी उल्लेखनीय कामाबद्दल सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचा सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दोन वर्षे येथे उत्कृष्टरित्या प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज केले आणि पोलिस ठाणे हे क्रमांक एक वर आणून दाखविले त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
अवघ्या सोळा तासांमध्ये सोलापूर येथील अपहरण झालेल्या युवकाचे सुटका सीसीटीएनएस उपक्रम उत्कृष्ट रित्या राबविणे, सदार बाजार पोलीस ठाणे हद्दीतील दोन घरफोडी व बस स्थानक येथील चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद, आबड यांची घरफोडी चे कमी वेळेमध्ये तपास इत्यादी कामांमध्ये उत्कृष्टरित्या कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या या वेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये समाधान तेलंग्रे, कैलास खाडे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे,पो. उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहा. पो. निरी. मंजुषा सानप, महिला कॉ. सुमित्रा अंभोरे, महिला पो. कॉ. मीरा मुसळे, महिला पो. कॉ. प्रियांका बोरकर, पो.उपनिरी. गणेश झलवार, पो. हेडकॉ. खरात, पो. हेडकॉ. शिरसाट, पो. हेडकॉ. मगरे, महिला पो.कॉ. गिरी, पो. ना.अशोक जाधव, कैलास खाडे, दीपक घुगे, संतोष पवार, पो.कॉ. हिवाळे, पो.काॕ. रंगे, इरशाद पटेल पो. कॉ. चौरे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, पो. ना.सोनवणे, पो. कॉ. योगेश पठाडे, पो.हेड काॕ. भंडारे, पोलीस हेडकॉ. बंटी ओहोळ, पो.नाईक रमेश फुसे, अनिल काकडे, पो. नाईक सक्रुउद्दीन तडवी, पो. हेडकॉ. पठाण, म पो.कॉ. पौर्णिमा सुलाने, महिला पोना कल्पना बोडखे, पो. हेडकॉ. इंगळे होमगार्ड खालेद आणि असलम पठाण, पो.हेड कॉ.जाधव, पो. हेड कॉ. सोनटक्के, महिला पोलीस नाईक सीमा जाधवर, पोलीस नाईक विनोद उरफाटे,महिला कॉन्स्टेबल शीला भिसे ई चा यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Leave a Reply