ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोरक्षण पांजरापोळ तर्फे सुभाष देवीदान यांचा सत्कार

July 1, 202112:51 PM 30 0 0

जालना ( प्रतिनिधी) : अखिल भारतीय मारवाडी संमेलन जालना शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोरक्षण पांजरापोळ न्यासाचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाषचंद्र देवीदान यांचा पांजरपोळ गोरक्षण च्या संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

बुधवारी ( ता. ३०) पांजरापोळ च्या संचालक मंडळ कार्यालयात न्यासाचे अध्यक्ष बनारसीदास जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी सत्कार सोहळ्यास संचालक ओमप्रकाश मंत्री , विजय कामड, अनिल सोनी, संजय लाहोटी, महेंद्र भक्कड, विजय राठी, कैलास बियाणी यांची उपस्थिती होती.
बनारसीदास जिंदल यांनी गो सेवेत एकशे पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या पांजरापोळ ला सुभाषचंद्र देवीदान यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले असून एप्रिल महिन्यात झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत ते विजयी झाले.देवीदान यांची मारवाडी संमेलन च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे कार्य अधिक उंचावेल. असा विश्वास बनारसीदास जिंदल यांनी व्यक्त केला.
सुभाषचंद्र देवीदान म्हणाले, सभासदांनी आपल्या वर विश्वास दाखवत सर्वात जुन्या संस्थेत काम करण्याची संधी दिली. संस्थेच्या हितासाठी आपण पुर्वी प्रमाणे कार्यरत राहणार असल्याचे सुभाषचंद्र देवीदान यांनी सांगितले. सुञसंचालन अनिल सोनी यांनी केले तर विजय कामड यांनी आभार मानले. संचालक मंडळाने सत्कार करून सुभाषचंद्र देवीदान यांना शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *