ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुभाष देवीदान हे ज्येष्ठांमधील उत्साही तरुण: रमेश पटेल

July 7, 202112:31 PM 37 0 0

जालना ( प्रतिनिधी) : साठीनंतर माणूस हा स्वतःचे आरोग्य आणि कुटुंब यांच्यातच गुंग होतो. मात्र या वयात सुध्दा उद्योग-व्यापार, सामाजिक व धार्मिक कार्यात प्रचंड उत्साहाने सदैव कार्यरत असलेले सुभाषचंद्र देवीदान हे जेष्ठांमधील उत्साही तरुण असल्याची भावना उद्योजक तथा के. पी.एम.सी.ग्रुपचे अध्यक्ष रमेश भाई पटेल यांनी व्यक्त केली.


” खाओ पिओ मजा करो ” हे ज्येष्ठ नागरिकांचे संघटन असलेल्या के. पी. एम. सी. ग्रुप तर्फे अखिल भारतीय मारवाडी संमेलन जालना शाखेचा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सुभाषचंद्र देवीदान यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात रमेश पटेल बोलत होते.
या वेळी ग्रुपचे कार्याध्यक्ष पोलाद चे संचालक कश्मीरी लाल अग्रवाल, सचिव नरेश कुमार गुप्ता, कोषाध्यक्ष जयकिशन जिंदल, सहसचिव नंदकिशोर मोतीवाला, उपाध्यक्ष गिरीधर लदानी ,सुनील गोयल ,अंकुशराव राऊत, कपूर गर्ग यांची उपस्थिती होती.

रमेश भाई पटेल पुढे म्हणाले, तरुणांना लाजवेल अशी जिद्द व चिकाटी या अंगभूत गुणांनी सर्वदूर परिचित असलेले सुभाष देवी दान यांची राष्ट्रीय पातळीवर दखल होणे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कपूर गर्ग यांनी जिंदादिल सहकाऱ्याच्या सत्कारासाठी आपल्या ला पुणे येथून सपत्नीक या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले असे सांगितले.

सुभाष चंद्र देवीदान यांनी सत्कारास उत्तर देताना जेष्ठ नागरिकांना त्यांचे आयुष्य खडतर न वाटता सुखी व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी दुर्गाप्रसाद लड्डा, राधेश्याम राठी, विपीन अग्रवाल, जितेंद्र गर्ग, गोवर्धन अग्रवाल, नरेंद्र गर्ग, गोपाल अग्रवाल, सुभाष अग्रवाल, विनोद गर्ग ,शरद गादिया, बिहारी चावला, रामगोपाल अग्रवाल,पुरूषोत्तम मोतीवाला, योगेश ठक्कर, दिगंबर पेरे ,श्री गाजरे यांच्यासह “खाओ पियो मजा करो” ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *