जालना (अनिता पवार) दि 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय पात्रता पात्रता परीक्षेत प्रा शा पारेगाव येथील विध्यार्थी कार्तिक अशोक भुसारे याची आंबा ता परतूर जि जालना येथे वर्ग 6 वी साठी निवड झाली आहे. कोरोना च्या काळात शाळा बंद असताना देखील ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अभ्यास घेऊन व प्रचंड सराव घेतल्यामुळे हे यश मिळाले आहे, कार्तिक एका सर्वसाधारण कुटुंबातील विध्यार्थी असल्याने पुढील शिक्षणासाठी त्याला याचा भरपूर फायदा होणार आहे.
या यशाबद्दल कार्तिकचे व त्याचे मार्गदर्शक व वर्गशिक्षक श्री आप्पासाहेब मुळे सर यांचे केंद्रप्रमुख श्री देशमुख सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर, श्री जोशी सर, श्री गिरी सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री केशव सुरुशे व सर्व सदस्य तसेच सरपंच श्री भाऊराव शेजूळ व सर्व सदस्य यांनी कौतुक केले आहे.
कार्तिक च्या यशामागे श्री आप्पासाहेब मुळे सर यांची खुप मेहनत असल्याचे कार्तिकचे आई वडील म्हणाले आहे.
Leave a Reply