ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नांना यश, खालापूर येथे नवीन प्रशासकीय भवन साकारणार

October 1, 202113:47 PM 52 0 0

खालापूर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे असणारे तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटिशांच्या काळातील असल्याने ती आता जीर्ण झाली आहे व इतर शासकीय कार्यालये भाड्याने इतर जागेत सुरू असल्याने ही सर्व कार्यालये एका इमारतीत यावीत यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी मे 2021 रोजी प्रशासकीय भवनाची मागणी केली होती व त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास 11 कोटी रुपये मंजूर केले आहेत.


सर्व सामान्य नागरिक स्वतःच्या अथवा सार्वजनिक कामासाठी अनेकदा तहसिल कार्यालय, सब रजिस्टर अशा अनेक शासकीय कार्यालयात येजा करत असतात व त्यांची कामे वेळेवर तसेच सुरळीत व्हावी हे प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असते. खालापूर येथील तहसिल कार्यालयास अद्याप पर्यंत प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत उपलब्ध नाही व असणारी इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे तसेच अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत काम करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आमदार महेंद्र थोरवे यांनी दिनांक २३ मे २०२१ रोजी नवीन प्रशासकीय भवन बांधणे करीता मागणी केली होती.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता व १० कोटी ९६ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.यामुळे खालापूर कारांसाठी लवकरच प्रशासकीय भवन साकारणार आहे. या निर्णयामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *