ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आदिवासी ,कातकरी लोकांना रेशन कार्ड, आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी कॅम्प चे यशस्वी आयोजन

December 27, 202116:23 PM 71 0 0

उरण ( संगिता पवार ) : पनवेल तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील लोकांचे जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी कॅम्प चे यशस्वी आयोजन सुशासन सप्ताहाचे अवचित्त्य साधून शुक्रवार ( दि. २४ ) रोजी उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके , मान तहसीलदार विजय तळेकर, , प्रभाकर नाईक मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग पनवेल आणि उरण सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील लोकांचे जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी पोयन्जे ग्राम पंचायत कार्यालय तालुका पनवेल येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आले.

सदर कॅम्प मध्ये पोयन्जे, बारवई, भिंगार ग्राम पंचायत हद्दीतील एकूण सहा वाड्या सहभागी झाल्या होत्या. ह्या कॅम्प मध्ये एकूण 1200 जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरून घेण्यात आले, एकूण साठ लोकांचे रेशन कार्ड चे नाव वाढवून दीले, नाव कमी करून दीले आणि दुय्यम रेशन कार्ड काढून दीले. बारा लोकांचे निराधार योजनेचे फॉर्म्स भरून घेण्यात आले आणि दोन अनाथ मुलांचे फॉर्म्स भरण्यात आले. तसेच एकूण 26 लोकांचे आधार कार्ड काधून देण्यात आली. सदर कॅम्प साठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण विभागातर्फे आदिवासी विकास निरीक्षक श्री जगदीश भानुशाली, आदिवासी विकास सहाय्यक श्री कैलास चव्हाण महसूल विभाग पनवेल तर्फे मंडळ अधिकारी श्री प्रभाकर नाईक, पुरवठा विभागाकडून श्री हसन आणि त्यांची टीम, तसेच विभागातील सर्व सहा तलाठी आणि कोतवाल , तसेच पंच म्हणून तिन्ही पोलीस पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. निराधार योजना समजावून सांगण्यासाठी आणि त्याचे फॉर्म्स भरण्यासाठी श्री कांबळे साहेब आणि टीम उपस्थित होते. आधार कार्ड बनविण्यासाठी आधार कार्ड केंद्राची टीम उपस्थित होती. को वी ड लसीकरणाच्या माध्यमातून 110 लोकांनी लस घेतली. उरण सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा राजेंद्र मढवी सर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, रायगड भूषण दत्ता गोंधळी, मनीष कातकरी, शांताराम पवार, संदीप म्हात्रे, रवी कातकरी, सुनील कातकरी उपस्थित होते. आदिवासी आश्रम शाळा चिखले येथील सर्व शिक्षक वर्ग यांनी खुप मोठे योगदान दिले. एवढ्या मोठ्या स्तरावर , 1200 जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरून घेण्याचा प्रयत्न 100% यशस्वी करण्यात यश आले. मान तहसीलदार विजय तळेकर साहेबांनी पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सदर दाखले पुढील 15 दिवसात सर्व आदिवासी बांधवांना देण्याचे आश्वासन दिले आहे. मान उप विभागीय अधिकारी श्री राहुल मुंडके साहेब यांनी अश्या प्रकारचे कॅम्प सर्व तालुक्यांमध्ये होणे गरजेचे आहे असे सांगितले. आणि पुढील काही महिन्यांत पनवेल आणि उरण तालुक्यातील एक ही कातकरी समाजातील व्यक्ती जातीच्या दाखल्या पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले. प्रा उरण चे मढवी र यांनी सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून भूमिका बजावली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *