ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुधाकर पाटील आणि गोरख ठाकूर यांचा आवरे गावच्या अपघातग्रस्त दिव्यांगाला मायेचा आधार

October 11, 202115:56 PM 13 0 0

अश्विनी धोत्रे.
सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असताना याद्वारे समाजाप्रती मोलाचे कार्य कसे घडवून आणता येईल हे उरण तालुक्यातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते तथा उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील सर आणि खोपटे गावातील होतकरू युवा सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी दाखवून दिले आहे.काहींदिवसा पूर्वी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवानी आवरे गावातील अपघातग्रस्त दिव्यांग बांधवाला मदत करण्या संदर्भातला मेसेज व्हाट्सअप च्या माध्यमातून प्रसारित केला असता ती पोस्ट सुधाकर पाटील आणि गोरख ठाकूर यांनी वाचून ताबडतोब त्या मदतीसाठी समर्थता दर्शवून मदत करण्याचे आश्वाशीत केले.


आवरे गावातील किशोर काशिनाथ म्हात्रे हे आपल्या उदरनिर्वाहापोटी bpcl येथे कँटीन मध्ये मजूर म्हणून काम करीत होते. काम संपल्यानंतर संध्याकाळी नेहमीच्या वेळेनुसार घरी परतत असताना त्यांचा 17 ऑक्टोबर 2019 रोजी भेंडखळ येथील मार्गांवर अपघात झाला होता.जवळ जवळ 2 महिने ICU मध्ये होते अपघातात किशोर म्हात्रे यांना दोन्ही पायात दिव्यांगत्व आले. घरची बेताची परिस्तिती वर मात करत तब्बल २ वर्षे या दिव्यांग बांधवावर उपचार सुरूच आहेत.पत्नी मोलमजुरी करून आपल्या घराचा संसार सांभाळत आहे. आपल्या नवऱ्याला जर एक व्हीलचेअर मिळाली तर किमान त्या आधारे त्रास कमी होईल आणि हालचालीस वेग मिळेल या हेतूने व्हीलचेअर च्या मागणीचा विषय उरण दिव्यांग संघटनेचे संदेश राजगुरू आणि राजेश भोईर यांच्याकडे मांडला.दिव्यांग बांधवानी विलंब न करता व्हाट्सअप च्या माध्यमातून मदतीच आवाहन केल्या नंतर सत्कर्माचा ध्यास असणाऱ्या सुधाकर पाटील सर आणि गोरख ठाकूर यांनी लगेचच 2 दिवसात व्हीलचेअर ची व्यवस्था करून आज दी.10 ऑक्टोबर 2021 रोजी गरजू दिव्यांग बांधव किशोर काशिनाथ म्हात्रे यांच्या आवरे येथील घरी प्रत्येक्षात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि व्हीलचेअर त्यांच्या स्वाधीन केली आणि किशोर म्हात्रेनी जणू मोकळा श्वास घेतल्याच्या भावनाच उदगारल्या.या कार्यामुळे उरणच्या दिव्यांग बांधवानी सुधाकर पाटील सर आणि गोरख ठाकूर यांच्यावर सोशल मीडिया च्या माध्यमातून कौतुक केले जात आहे.यावेळी उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार सर, राजेंद्र मढवी,राजू मुंबईकर,पत्रकार घनश्याम कडू, आणि दिव्यांग प्रतिनिधी राजेश भोईर उपस्थित होते. या कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्ते यांच्या या महान कार्याला दिव्यांग बांधवांचा सलाम!

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *