ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खोपटे गावाची सुकन्या कुमारी अमेघा अरुण घरत हिला सर्वोतोपरी मदत करणार.- महेंद्रशेठ घरत

September 28, 202114:49 PM 22 0 0

उरण(संगिता पवार) खोपटे गावातील सुकन्या कुमारी अमेघा अरुण घरत हिने खुस्ती (wristling)या प्रकारात हरियाणा रोहतक येथे झालेल्या स्टुडंट्स ऑलम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. व तिची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला पुढील स्पर्धेसाठी बाहेर देशात जायला लागणार असल्याने तिला जि काही मदत लागेल ती मी देणार असल्याचे तिला आणि तिच्या कुटुंबियांना रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले.


काल उरण पूर्व विभागात चिरनेर, भोम, मोठीजुई, कोप्रोली, पाणदिवे, खोपटे. येथील साखर चौथीच्या सार्वजनिक गणपती बप्पाचे दर्शन त्यांनी घेतले. खोपटे येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री केशव घरत यांच्या गणपती बप्पाचे दर्शन घेतावेळेस कुमारी अमेघा अरुण घरत हिचा सत्कार केला व परदेशी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जी काही मदत माझ्याकडून लागेल ती मी देणार असे सांगितले त्याची तु काही काळजी करू नकोस. मैदानी खेळात मुलींची संख्या हि नगण्य असते. आणि तु आगरी समाज्यातील असल्याने .आणि आगरी समाज्यातील मुली ह्या मैदानी खेळात एकतर मुलींची संख्या तुरलक असते. त्यात तुने हि गगनभरारी घेतलीस.याचा जास्त अभिमान आम्हाला आहे.त्याबद्दल तुझे अभिनंदन. आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
यावेळी मोठीजुई येथील दोन कुटुंबातील व्यक्ती दगावल्याने त्यांच्या कुटुंबियांचे देखील सांत्वन जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *