ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक विद्वत्तेचा ज्ञानसूर्य: विश्वरत्न भारतीय संंविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

April 13, 202113:47 PM 123 0 0

वर्षातील एप्रिल महिना हा एक सुवर्ण काळ मानला जातो. कारण याच महिन्यात जगात विद्वत्तेचा आविष्कार घडवणारा ज्ञानसूर्य जन्माला आला. याच ज्ञानसूर्याच्या ज्ञान तेजाने सर्व जगाला दिपवून टाकले. असा हा ज्ञानाचा महासागर, कोटी जनांचा कैवारी, विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. 14 एप्रिल 1891 हा त्यांचा जन्मदिन. आज बाबासाहेबांची 130 वी जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात आनंद उल्हासात साजरी होत आहे. याच निमित्ताने या ज्ञानाच्या महासागराला स्पर्शून त्यांच्या बहुमोल कार्याचा आढावा या लेखातून आपल्यापर्यंत पोहचवीत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जागतिक विद्वत्तेचे प्रतीक आहेत. सन 1896 ते 1923 या शैक्षणिक प्रवासात त्यांनी बी.ए., एम. ए., पी.एचडी., एम. एस्सी., डी. एस्सी आणि बार- अँट-लाँ या महत्वपूर्ण पदव्या त्यांनी संपादन केल्या. एवढेच नाहीतर त्यांनी जागतिक स्तरावर अनमोल असे विद्वत्ता पुर्ण शोधनिबंध सादर केले. आणि विशेष म्हणजे जगाने ही त्याची नोंद घेतली. या शोधनिबंधात व्यापार व्यवस्था, अर्थव्यवस्था, शेती व्यवस्था,आणि जातीव्यवस्था हे त्यांचे आवडते विषय होते.

कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जो प्रबंध सादर केला होता, त्याचा विषय होता प्राचीन भारतीय व्यापार,(Ancient Indian Commerce) त्याच विद्यापीठामध्ये पी.एचडी च्या प्रबंधाचा विषय होता, भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन (The National Divident of India: A Historical Analytical study) प्रबंध प्रकाशित झाला, हाच प्रबंध जेव्हा ग्रंथ रुपात आला, तेव्हा त्याचे नाव ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती(The Evolution provicial Finance in British India)हे होते. आणि लंडनमध्ये विद्यापीठात एम.एस्सी साठी त्यांचा प्रबंध होता त्याचा विषय होता, रुपयाचा प्रश्न(The problem of rupee) होता.

पुढे कोलंबिया विद्यापीठाच्या एका चर्चासत्रात भारतातील जाती त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृध्दी(Caste In India: Their mechanism,genesis and Development) तर हाच पुस्तकाच्या रुपात भारतातील जाती (Caste in India)म्हणून प्रसिद्ध आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करणे सुरु केले होते आणि हे कार्य करताना त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न होता, तो म्हणजे तळागाळातील तमाम कोटी जणांचे कल्याणकारी मानवजातीसाठी काम करणे. एवढेच नाही तर अस्पृषोद्धारक समाजातील लोकांसाठी त्यांना हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देणे, हे महत्त्वाचे कार्य. मानसाला माणूस म्हणून जीवन जगता यावे, यासाठी लढा द्यायचे ठरविले. त्यांना अस्पृशामध्ये प्रतिष्ठेची, सामाजिक, संस्कृती, शैक्षणिक, वैचारिक आणि सदाचरणाची क्रांती घडवून आणायचे होती.

मानवतेचा लढणारा क्रांतीयोद्धा हत्याराविणा आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता समाज क्रांती घडवून आणीत होते. त्याचे हत्यार होते सत्याग्रहाचे. यात पुणे येथील पर्वती मंदिर, नाशिक येथील काळाराम मंदिर, तर पाण्यासाठी महाडचे चवदार तळे हे सर्व माणसाच्या समतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी त्यांनी सत्याग्रह केले. यासोबतच एक विचारक्रांती घडली पाहिजे, आपले विचार तळागळातील माणसापर्यंत पोहोचले पाहिजे,चळवळ प्रवाही व्हावी यासाठी त्यांनी वृत्तपत्र काढले. त्यामध्ये मुकनायक, जनता, बहिष्कृत भारत, समता,आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविले.

त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यांना मंत्रिपदे मिळाली. मजूर मंत्री असताना मजुरांचे आणि मालकांचे हित होईल, आशा गुणांना त्यांनी महत्त्व दिले. मजूरांचे कामाचे तास, सुट्टी त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले. तर बांधकाम मंत्री असताना विमानतळे बांधले दामोदर व्हॅली , जल संसाधने आणि संवर्धन,हिराकुंड धरणाची निर्मिती, सोन नदी प्रकल्प आणि विद्युत प्राधिकरण, नदीखोरे प्राधिकरण, आंतरराज्य नद्या जोड प्रकल्प , विविध विद्युत प्रकल्प आणि कामे त्यांनी केली. यामुळे शेतकरी वर्ग सधन झाला. विधीमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मनातील स्वप्न पूर्ण केले.

कारण बाबासाहेबांना भारत देशाची राज्यघटना लिहिण्याची संधी प्राप्त झाली. आणि यातून गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, म. ज्योतिराव फुले, शाहू महाराज, बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड ह्यांचा आदर्श पुढे ठेवून त्यांनी लोक कल्याणाकारी मानवतावादी समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ह्या आदर्श मूल्यांची देणगी त्यांनी देशालाच नाही तर संपूर्ण जगाला दिली.
त्यांचे विद्यार्थी,शेतकरी, कामगार, प्रत्येक नागरिक तसेच स्त्रीयांसाठी मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे 14 आक्टोबर 1956 बौध्द धम्माची दीक्षा घेतली. आज दिनी या जगविख्यात महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!

 

– बाबुराव पाईकराव
डोंगरकडा.
मो. 9665711514.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *