ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुनेने केली सासूची हत्या

January 27, 202114:17 PM 88 0 0

बिहारची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने आपल्या सासुची हत्या केल्यानंतर स्वत:ला आग लावून घेतली. आग लावून घेतल्यानंतर ही महिला आरडाओरड करत आगेच्या ज्वालांमध्ये लपटेलेल्या आवस्थेत घराबाहेर आली तेव्हा गावकऱ्यांना धक्काच बसला. शेजाऱ्यांनी या महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि तिच्यावर कापड टाकून आग विझवली. नंतर या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना परसा बाजार पोलिसांच्या हद्दीतील सकरैचा येथे घडली आहे. सून ललिता देवी हिनेच सासू धर्मशीला देवीची हत्या केल्यानंतर स्वत:ला आग लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

स्वत:ला आग लावण्याआधी ललिता देवीनेच धर्मशीला देवी यांची हत्या केली. त्यानंतर अगदी क्रूरपणे तिने आपल्या सासूच्या मृतदेहाची विटंबना केली. तिने सासूचे डोळे फोडले, तसेच हाताची बोटंही कापली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धर्मशीला देवी यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ललिता देवीलाही पीएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना घटनास्थळी धर्मशीला देवींची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही सापडला आहे.

गावात राहणाऱ्या राजकुमार सावची पत्नी आरती आणि आई धर्मशीला देवी यांच्यात कायमच भांडणं होत असायची. ही भांडण अगदी दोघींमध्ये हणामारी होईपर्यंत जायची. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार दोघींमध्ये नेहमीच छोट्या मोठ्या करणांवरुन वाद होत असले तरी अनेकदा धर्मशीला देवी ललिताला मूलबाळ होत नसल्याने टोमणे मारयाच्या. अशाच एका वादातून ललिता देवीने मंगळवारी सासूवर चाकू हल्ला केला. सासूची हत्या केल्यानंतरही ललिता देवीचा राग शांत न झाल्याने तिने हत्येसाठी वापरलेल्या चाकूनेच सासूचा डोळा फोडला आणि तिच्या हाताची बोट कापली. यानंतर तीने स्वत:ला जाळून घेतलं. संपूर्ण घटनाक्रम घडला तेव्हा घरामध्ये ललिताचा पती तसेच सासरे या दोघांपैकी कोणीही नव्हतं. पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहेत.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *