ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अंधश्रध्दा एक ज्वलंत समस्या

May 14, 202213:00 PM 41 0 0

अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली एक कीड आहे. ही एक मानवी जीवनातील ज्वलंत समस्या आहे. बुवाबाजी आणि भोंदूगिरी करणार्‍या माणसांपासून सामान्य जनतेने दूर राहायलाच हवे आहे. यांच्या जडीबुटीने कोणत्याही आजारावर इलाज होऊ शकत नाही. हेच या कथेतून श्री. अच्युत मोरे सर सांगू इच्छित आहेत.

भोंदू बाबा हे कोणत्याही आजारावर इलाज करतात असं ते भासवत असतात. आणि सामान्य जनतेची पिळवणूक करत असतात. हे ह्या कथेवरून सिद्ध होत आहे. परंतु कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचे नाव ऐकताच त्यांची कशी पळता भुई थोडी झाली हे दिसून येते. म्हणजेच त्यांचे इलाज हे खोटे आहेत हे सिद्ध होत आहे. कारण सामान्य जनता हे या आजाराला घाबरून आपली फसवणूक करून घेत आहेत. असे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराला सामान्य जनतेने घाबरून न जाता वैद्यकीय इलाज करून घ्यावे. सर्दी, खोकला आणि ताप असल्यास अशा रुग्णाने सरकारी हॉस्पिटल मध्ये जाऊन आपले इलाज करून घ्यावे. तसेच घाबरून जाऊ नये. असे या चित्रफिती वरून आव्हान केलेले दिसत आहे.

कोणत्याही प्रकारचे अभिनयाचे शिक्षण न घेता. आणि अनुभव नसतानाही अच्युत मोरे सरांनी उत्तम अभिनय केला आहे. स्वलिखित रचना असल्याने चांगला संदेश देत आहे. तसेच त्यांचे सहकारी, कलाकारांनी सरांना चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. चिंचवाल्या बाबांची भूमिका त्यांचे ते अभिनय त्यांनी उत्तमप्रकारे वठविले आहे.
तात्पर्य असे की कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. आणि त्याला बळी पडू नका. आपल्या भारतात आयुर्वेदिक उपचारांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे कोणत्याही बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या उपचारांचे नाहक बळी पडू नका. वेळीच सावध व्हा.
अष्ठभुजा हिरकणी
सौ. छाया म्हात्रे.
पनवेल-रायगड

 

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *