ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड.

November 3, 202116:20 PM 70 0 0

उरण (संगिता पवार  ): सुरेश पोसतांडेल हे उरण नगरपरिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करीत आहेत. सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने नगराध्यक्ष सायली म्हात्रे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम करणारे, स्वच्छ चारित्र्य संपन्न म्हणून सर्वत्र सुरेश पोसतांडेल यांची ओळख असून सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. ते नगर परिषद /नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम करत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड महाराष्ट्र राज्य नगरपरिषद /नगरपंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.

दिनांक 31/10/2021 रोजी शेगाव येथे झालेल्या सभासदांच्या सर्वसाधारण सभेत कर्तव्य दक्ष कर्मचारी सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र नगर परिषद /नगर पंचायती कर्मचारी /संवर्ग कर्मचारी या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदीप रावनकर, प्रदेश सरचिटणीस पदी रामेश्वर वाघमारे व प्रदेश कोषाध्यक्ष अनिल पवार यांची नेमणूक झाली आहे. नवनियुक्त या सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी त्यांना सोशल मीडिया द्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *