ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुरुपखानवाडी जि. प.शाळेचे उपक्रम कौतुकास्पद,जि. प.सदस्य बाबासाहेब पवार यांचे प्रतिपादन

September 17, 202113:07 PM 7 0 0

विदया निकाळजे( सातारा प्रतिनिधी) ता.माण, गोंदवले- कोरोना काळात शाळा बंद,पण शिक्षण चालू हे वाक्य डोक्यात घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ ऑनलाईन अध्यापन,प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन विद्यार्थाना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन व विद्यार्थाचे गट करून मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व शिक्षक अत्यंत प्रामणिक पणे ज्ञानार्जनाचे कार्य करीत आसल्याने सुरूपखानवाडी जि.प.शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जि.प.सदस्य बाबासाहेब पवार यांनी केले.


जि.प.शाळा सुरूपखानवाडी ता.माण येथे शालेय खोल्यांचे नुतनीकरणचा शुभारंभ जि.प.सदस्य बाबासाहेब पवार व पंचायत समिती सदस्या सौ.कविता जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ.कविता जगदाळे यांनी शाळेच्या प्रगती बाबत बोलताना आपले विचार प्रकट केले.शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.गावचे सरपंच.सौ सुरेखा जाधव,व पोलीस पाटील राजेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या नेत्रदिपक प्रगती बाबत मुख्याध्यापिका वर्षा देवकर यांनी माहिती दिली.त्या म्हणाल्या नवीन शैक्षणिक वर्षात बहुसंख्येने मुलांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. सदर कार्यक्रमात सुरूपखानवाडीचे उपसरपंच बाळू कोकरे यांनी शाळेला स्मार्ट एल.सी.डी.देण्याचे जाहीर केले व जानुबाई तरूण गणेश मंडळ यांच्या मार्फत शौचालय दुरूस्तीसाठी पंचवीस हजार रूपये देण्याचे जाहीर केले सर्व देणागीदारांचे शाळेच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सदस्य तानाजी मगर व दादासाहेब चोपडे, जगन्नाथ इंदलकर,,हिम्मत खराडे,धनाजी आवळे,विठ्ठल खराडे,आनंदराव इंदलकर,हनुमंत खराडे,गणेश संत्रे, विस्ताराधिकारी सौ.सोनाली विभुते, केंद्रप्रमुख नारायण आवळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद शिलवंत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा देवकर, सौ.मनिषा ननावरे यांनी परिश्रम घेतले तर आभार दिलीप गंबरे यांनी मानले. छाया- शाळा नुतनीकरणाचा शुभारंभ करताना जि.प.सदस्य बाबासाहेब पवार व मान्यवर.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *