जुन्नर येथे तलाठी असणाऱ्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोड़ा मारून तसेच चाक़ूने वार करून निघृण खून केला.मोशीतील बो-हादेवस्ती परिसरात सोमवारी दिनांक ६-९-२०२१ ला सकाळी ही धक्कादायक घटना उघड़कीस आली. खून केल्या नंतर आरोपी पती फरार झाला आह सरला विजय साळवे वय वर्षे ३२ राहणार मोशी असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे . विजयकुमार साळवे वय वर्षे ३४ राहनार मोशी असे आरोपी पतीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजयकुमार साळवे हा जुन्नर येथे
तलाठी आहे.मागील दोन वर्षापूर्वी सरला आणि विजयकुमार यांचा प्रेम विवाह झाला आहे. ते दोघेहि विदर्भातील असून
मोशी येथे भाड्याच्या घरात रहात होते. दरम्यान चारित्र्याच्या संशयावरुन विजयकुमार आणि सरला यांच्यात वाद नेहमी होत असे दरम्यान रात्री सरला झोपल्या असताना विजयकुमार याने त्यांच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला त्या नंतर चाक़ूने भोसकून निघृण खून केला.घटने नंतर विजयकुमार फरार झाला.दरम्यान विजयकुमार आणि सरला
दोघांच्याही ओळखीचा असणाऱ्या मित्राने त्यांना फोन केला.दोघेहि फ़ोनला उत्तर देत नसल्याने त्यांच्या घरी आला.घर बंद असल्याने मित्राला संशय आला.त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघड़ला असता आत मध्ये सरला या रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या दिसून आल्या. याप्रकरनी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सरला व विजयकुमार दोघांचा प्रेमविवाह असून दोघे दोन वर्षापासून मोशीत रहात होते.आपले स्वतःचे घर असावे असे दोघांचेही स्वप्न होते.त्यानुसार दोघेहि काम करीत होते.अखेर त्यानी नुकताच फ़्लैट घेतला होता शनिवार दिनांक ४-९-२०२१ ला त्या फ्लैट्ची वास्तु शांतीची पूजाहि केली.दोघेहि नव्या घरात राहायला जाण्याच्या तयारीत होते.त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी दोघांमध्ये भांडण झाल्याने विजयकुमार याने पत्नी चा खून केला.यामुळे दोघांच्या मेहनतीची ती वास्तु मात्र मालकाच्या प्रतिक्षेतच राहणार आहे.
हे वृत वाचून मनास फार दुःख झाले.मानसांच्या कडून हिंस्रपशुला सुद्धा लाजवतील अशा घटना घडू लागलेल्या आहेत.कीड़ा मुंगी प्रमाणे माणसाना मारले जावू लागलेले आहे.माणसाचे मरण आता स्वस्त झालेले आहे. माणसाने कोणतीहि कृती करताना याचे भविष्यात काय दूरगामी परिणाम होणार आहेत त्याचा नेहमी विचार करने गरजेचे आहे.या ठिकाणी घड़लेल्या घटनेला संशय कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. संशय घेणे किती वाईट आहे ,संशय हाच एकाचा कायमचा जीव घेवून गेला. सुखी चाललेल्या संसाराला संशय रूपी राक्षसच जणू पतिच्या अंगात संचारल्या मुळे पत्नीचा डोक्यात हातोडा घालून व चाक़ूने भोसकुन खून करून फरार झाला आहे.ज्या पत्नी बरोबर दोन वर्ष संसार करून सुद्धा एवढे खून करण्या पर्यन्त मजल जात असेल तर ती विकृति आहे.
वियजकुमारने आपला राग आवरला असता तर ही वेळच आली नसती पूर्वीची म्हण सर्व श्रुत आहे “राग आणि भिक माग ” या म्हणी प्रमाणे त्याचेवर वेल आलेली आहे.कारण खून करून फरार होणे हा अक्षम्य गुन्हा आहे. पोलिस त्याला कसल्याही परिस्थितीत शोधून काढून त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा कशी करता येईल याचाच पोलिस नक्कीच प्रयत्न करतील.महत्वाचे म्हणजे सोन्यासारख्या असणाऱ्या नोकरीस मुकला आहे.अशी महत्वाची नोकरी कोणाला मिलत नसते अशा नोकरीवर पाणी सोडावे लागलेले आहे. तसेच विजयकुमार यांचे आई वडील हयात असतील तर त्यांच्या वृद्ध काळात असणारी त्यांची आधाराची काठीच आता मोडून पडलेचा भास होत आहे.
संशय घेणे हा काहिंचा स्वभाव गुण असतो. त्यामुळे एखाध्याच्या स्वभावाला औषध नसते त्याप्रमाणे त्या स्वभावाचाच
हा अघोरी प्रकार या घटनेत घडून आलेला आहे.थोडा विचार केला असता तर संशयाचे निराकरण झाले असते अगदीच पटत नव्हते तर घटस्फोटाचा त्यावर उपाय होता पण हा असा अघोरी विचार करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे.कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संसार धुळीला मिळालेला आहे. विवाह हा सुद्धा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला होता त्यामुळे प्रेमविवाह करणारे शक्य तो दोघांचे स्वभावगुण एकमेकाना पटल्यामुळेच प्रेमविवाह करतात.आणि प्रेमविवाह करणारांचे एकमेकांवर अधिक प्रेम असते.त्यामुळेच तर ते प्रेमविवाह करतात पण प्रेमविवाह करणारे बरेच विवाह यशस्वी झालेले आहेत.
आता काहीहि आपण विचार केला तरी केला तरी काही उपयोग होणार नाही. कारण केलेल्या गुन्ह्याची मिळणारी शिक्षा भोगण्या शिवाय दुसरा उपाय नाही.असा संशय घेणारा स्वभाव गुण असेल तर आपण त्या संशयी गुणाचा त्याग केला केला पाहिजे.अन्यथा अशा किती निरपराधी महिलांचे संशयावरून पतीकडून बळी जाणार आहेत हे काहीच कळत नाही.यापूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत.अशा पतीचे संशयी स्वभाव बदलेले नाही तर भविष्यात “संशयी पतीने पत्नीचा केला खून”अशाच बातम्या वाचावयास मिळणार की काय ? अशीच भीती वाटते.
Leave a Reply