ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजिप शाळा कोंढरीच्या विद्यार्थीनींचे सुयश

January 8, 202216:00 PM 35 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हददीतील करंजा येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोंढरीच्या विद्यार्थीनी हेतल प्रवीण पांचाळ आणि तनिष्का चेतन पाटील या विद्यार्थीनींनी महाराष्ट्र राज्य इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत तसेच नुकत्याच पार पडलेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्स आयोजित शालेय स्पर्धेत विशेष यश संपादन केले आहे. 

कुमारी हेतल प्रवीण पांचाळ हिने पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत रायगड जिल्ह्यात विशेष प्रावीण्यसह ८७ वा क्रमांक आणि जिल्हास्तरीय द्रोणागिरी स्पोर्ट्स आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच कुमारी तनिष्का चेतन पाटील हिने शिष्यवृत्ती परिक्षेत विशेष यश संपादन करत रायगड जिल्ह्यात १७१ वा क्रमांक पटकावला आहे आणि जिल्हास्तरीय द्रोणागिरी स्पोर्ट्स युवा महोत्सव आयोजित तनिष्का पाटील हिने वक्तृत्व स्पर्धेत व्दितीय, हस्ताक्षर स्पर्धेत व्दितीय, निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तरी या दोन्ही विद्यार्थीनींच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना कोंढरी शाळेचे मुख्याध्यापक म.का.म्हाञे, सहशिक्षिका प्रमिला गावंड, समता ठाकूर आदिंचे सहकार्य लाभले आहे. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन कोंढरी गावचे सुपुञ राजिप शिक्षक रत्नाकर तुकाराम पाटील यांचे लाभले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *