सिंधुदुर्ग प्रतिनिधी (सौ.संपदा बागी-देशमुख) : विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्ग चे विद्यार्थी नेहमीच विविध स्पर्धेत, शालाबाह्य परीक्षेत आपल्या गुणवत्तेने जिल्ह्यात व राज्यात चमकत असतात. Indian Talent Search परीक्षेत कु. सोहम शिवराज करले (इयत्ता : पहिली) याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु. अथर्व संजय साबळे (इयत्ता : दुसरी) याने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. श्रेयस शिवराज करले (इयत्ता : चौथी)याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेतही कु. श्रेयस शिवराज करले (इ. 3 री) व वैष्णवी विश्वनाथ चव्हाण (इ. 4 थी) यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त झाला. यांना पालक श्री.व सौ. करले, श्री.व सौ.साबळे, श्री. व सौ. चव्हाण तसेच वर्गशिक्षिका श्रीम संपदा बागी-देशमुख, श्रीम. ज्योती पवार , श्री संजयकुमार शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले. शा. व्य. स. अध्यक्ष, सदस्य तसेच केंद्रप्रमुख श्री. शिवाजी पवार, गटशिक्षणाधिकारी श्री. शिनगारे साहेब तसेच शिक्षक व पालकांनी सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Leave a Reply