जालना: स्वा. सावरकरांचे विचार घराघरात-मनामनात पोहोचविण्याच्या हेतूने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, जालना निर्मित “स्वा. सावरकर दिनदर्शिका-२०२१” चे विमोचन हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्री. धनसिंह सूर्यवंशी, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष सौ.शुभांगीताई देशपांडे, श्री. दीपक रणनवरे, श्री. संजय देशपांडे यांच्या हस्ते आज दि.९ जानेवारी शनिवार रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी स्वा. सावरकरांच्या स्मारकाला हार घालून अभिवादन केले.यावेळी श्री धनसिंह सूर्यवंशी, सौ.देशपांडे यांनी या घरोघरी सावरकरांचे विचार पोहोचविण्यासाठी निर्मित दिनदर्शिका उपक्रमाचे कौतुक करून नक्कीच यामाध्यमातून सावरकर प्रत्येक घरात पोहोचतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल पाठक तर आभार प्रदर्शन सुमितजी कुलकर्णी यांनी मानले.यावेळी सौ.आनंदी अय्यर,सौ. दीपाली बिन्नीवाले, ऐड. विनोद कुलकर्णी, कृष्णा दंडे, संतोषअप्पा नामदे, अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, सुमित कुलकर्णी, किशोर माधवले, विद्याधर दंडनाईक, ऐड. विलास कुलकर्णी, गणेश रेंगे, प्रथमेश कुंटे, संकेत मोहिदे, वैभव जोशी, आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply