ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 37 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 16 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

December 15, 202015:48 PM 92 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 16 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर 25, कडवंची 01, देडकर वाडी 01, मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी 01, परतूर तालुक्यातील दैठणा 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर 01, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर 01, टेभुर्णी 02, चिंचखेड 03 इतर जिल्हा बुलढाणा 01 असे आरटीपीसीआरद्वारे 37 तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 37 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18833 असुन सध्या रुग्णालयात- 120 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6543, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-324 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-96465 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-37 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12792 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 83285 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-61 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5775.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6047, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-3, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-120,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-16, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12151, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-307,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-195684, मृतांची संख्या-334. जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *