जालना (प्रतिनिधी) शहरातील स्वातंत्र्यवीर प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर दिनदर्शिका २०२१ चे विमोचन प.पू. भगवानमहाराज आनंदगडकर यांच्या हस्ते गुरूवारी आनंदगड येथे करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने नियमित विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांची दर्जेदार माहिती असलेली दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. दिनदर्शिकेत प्रत्येक पानावर सावरकरांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी प.पू. भगवान महाराज यांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, कृष्णा दंडे, सुमित कुलकर्णी, संकेत मोहिदे, अमोल पाठक, अॅड. विलास कुलकर्णी, प्रथमेश कुंटे, वैभव जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच देऊळगाव राजा येथेही विमोचन सोहळा पार पडला.
Leave a Reply