ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेव्याचा स्वयंभू शंकर मंदिर

August 9, 202115:42 PM 20 0 0

उरण(संगिता पवार) उरण तालुक्यातील जे एन पी टी गेस्ट हाउस समोरील बाजूस असलेले ३५० वर्षापूर्वीचे स्वयंभू शंकर मंदिर होय .उरण शहरा पासून सुमारे ११ किलो मिटर अंतरावर असलेले गर्द हिरव्यागार झाडीत शांत वातावरांत असलेल शंकर मंदिर होय. ह्या शंकर मंदिरास शेव्याचा म्हणजेच जे एन पी टी ज्या ठिकाणी आहे तिथे शेवा नावाचे गावं होते .जे एन पी टी आल्याने तेथील गावाचे पुनर्वसन करण्यात आले . मंदिर तिथेच ठेवण्यात आले त्या मुळे या मंदिरास शेव्याचा शंकर मंदिर म्हटले जाते. या मंदिरात हेमांड पंथी मूर्ती आहेत ,त्यात गणपती ,पार्वती ,नन्दी ,हनुमान अश्या देवतांच्या मूर्ती हेमांड पंथी आहेत हेमांड पंथीम्हणजे मूर्ती वरच्या बाजूस चपट्या असतात त्याच प्रमाणे साईबाबा ,दत्तात्रेय ,वेताळ ,अश्याही मुर्त्या आहेत .पुरातन उंबराचे झाड आहे मंदिराच्या आवारात बेल पानाची ५ झाडे आहेत .मंदिराच्या समोरील बाजूस भव्य दिपमाळ आहे


मंदिराच्या मागील बाजूस एक शिला आहे त्या ठिकाणी भक्तांनी मनोभावे आपली इच्छा सांगितली की ती इच्छया पूर्ण होते असे भक्तगण सांगतात . मंदिराचे पुजारी संतोष शिवराम दर्णे ,त्यांचे वडील शिवराम दर्णे ,वामन दर्णे ,मसनाजी दर्णे ,पुतलाजी दर्णे ,जगू दर्णे अशी आमची आठवी पिढी आहे आम्ही महादेवाचे सेवा करीत आहोत असे मंदिराचे पुजारी संतोष दर्णे यांनी सांगितले . . .दर वर्षी महा शिवरात्री ,हनुमान जयंती ,राम नवमी ,त्रिपुरा पौर्णिमा ,श्रावण महिन्यातील चार सोमवारया दिवशी मोठ्या उत्सवात साजरे करतात . श्रावणी सोमवार या दिवशी सकाळी आरती ,अभिषेक , भजन आदी ठेवण्यात येते .दानशुर लोकांच्या वतीने भक्तासाठी सकाळी साबुदाणा खिचडी ,दुपारी महाप्रसाद आयोजन केले जाते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *