ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वंचितच्या आंदोलकांची बदनामी केल्याप्रकरणी दोषी पोलिसअधिकाऱ्यांवर कारवाई करा-दिपक डोके ‌‌ ‌‌ ‌‌ ‌‌

October 16, 202113:39 PM 88 0 0

जालना (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉक डाऊनच्या काळात महाराष्ट्रातील बंद असलेली बस सेवा पुर्वत चालू करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दिनांक १२ /८/२०२० रोजी जालना बस स्थानक येथे डफली बजाव आंदोलन करण्यात आले होते.

या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक पदाधिकारी यांच्या वर सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक गुन्हे दाखल असल्याने या गुन्ह्यांत जामीन घेतलेला असतांना देखील केवळ वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने दिनांक १३.१०.२०२१ रोजी वर्तमानपत्रामध्ये जिल्ह्यात २२ आरोपी केले जेरबंद” या सदराखाली वृत्त प्रसारीत झाले आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रसार माध्यमातून बदनामी झाली आहे तरी याप्रकरणी ज्याच्या आदेशानुसार प्रशिध्दी पत्रक काढले गेले अशा दोषी पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यामागणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक औरंगाबाद यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके यांनी प्रशिध्दिपत्रकाव्दारे दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *