भारतातील काही लोक व राजकीय पुढारी तालीबानचे समर्थन करीत आहे ही चिंताजनक बाब आहे.भारतातील तालीबान समर्थकांनी सावधान रहाण्याची गरज आहे.कारण तालीबाण्यांची क्रृरता शिगेला पोहोचली आहे.अफगानिस्तानमध्ये तालीबान्यांच्या बाबतीत एवढे दहशतीचे वातावरण आहे की आपला जीव वाचविण्यासाठी महीला कोणत्याही देशात शरण घेतल्यास तयार आहे.भारत हा लोकशाहीचा मोठा आधारस्तंभ आहे व या भुमित अनेक धर्माचे,पंथाचे व जातीचे लोक रहातात.सध्याच्या परिस्थितीत तालीबानी भारतासाठी जहरीला साप आहे.याचा सर्वांनाच चांगलाच अनुभव आहे.त्यामुळे जर भारतात राहून जर कोणी तालीबानचे गुण गावत असेल व समर्थन करीत असेल तर त्यांनी आतापासूनच सावध रहाले पाहिजे.कारण तालीबानी असा साप आहे वेळपडल्यास आपल्याच माणसांना केव्हाही डंक मारून शकतो.त्यामुळे भारतातील तालीबान समर्थकांनो सावधगिरीने वक्तव्य करावीत. कारण सध्याच्या परिस्थितीत तालीबानी हे आपल्यासाठी आतंकवादीच आहेत. तालीबान्याचे मानुस्कीचे कोणतेही चित्र अजुनपर्यंत जगासमोर आलेले नाही.आताही तालीबानी अफगाणि नागरिकांवर,महीलांवर अत्याचार करून खुनी तांडव करीत आहे.त्यामुळे तालीबान्यांना चांगले म्हणनाऱ्यानी थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे.सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला अत्याचार पहावल्या जात नाही.तालीबान्यांनी सध्याच्या परिस्थितीत क्रृरतेच्या संपूर्ण सिमारेखा ओलांडल्या आहेत.
अशा परिस्थितीत जर भारतातील काही राजकीय पुढारी व काही लोक तालीबानचा जयजयकार करीत असेल तर ही बाब भारतासारख्या लोकशाही देशाला घातक ठरू शकते.काही लोकांना किंवा देशांना तालीबानी साफसुत्रे वाटतात मग अफगाणिस्तानातून लाखोंच्या संख्येने लोकांचे पलायन का होत आहे?याचा विचार सर्वांनीच करायला पाहिजे.महीलांवर,मुलांवर,आबाल-वृध्दांवर अत्याचार व घृणास्पद कृत्य करणारे तालीबानी खुनी होळी खेळत आहे हे भारतातील तालीबान समर्थकांना दीसत नाही? आजही भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की भारतात रहातात व भारताचेच खातात परंतु गुन मात्र पाकिस्तानचे गातात यातलेच काही लोक तालीबानचे गुण गातांना दिसत आहे.म्हणजेच ज्या ताटात खायचे त्याच ताटाला छिद्र पाडायचे अशी परिस्थिती तालीबान समर्थकांची दिसून येते.त्यामुळेच त्यांना पाकिस्तान सोबतच तालीबानी खुपचं जवळचा वाटत आहे.भारतात बसुन तालीबानी व पाकिस्तानची तरफदारी व जीहुजुरी करणाऱ्यांनो हे याद राखा की आपण भारतात आहात म्हणुनच सुखरूप सुरक्षित आहात व गुण्या गोवींदाने जगत आहात.हेच जर आपण पाकिस्तान किंवा तालीबान्यांसोबत रहाले असते तर केंव्हाच संपले असते.त्यामुळे तालीबानसोबत चर्चा केव्हा व कशी करायची ही बाब भारत सरकारवर,सुरक्षा विभागावर सोपवली पाहिजे.कारण गेल्या अनेक वर्षांपासून आतंवाद्यांनी भारताला अनेक जखमा दीलेल्या आहेत.मुंबई वरील आतंकवादी हल्ला,संसद भवनावरील हल्ला,पुलवामा अशा अनेक जखमा आतंकवाद्यांनी भारताला दील्या आहेत आणि आतंकवाद्यांचे खरे सुत्रधार तालीबानी आहेत.कारण तालीबानी आतंकवादी समुहामध्ये संपूर्ण जगाच्या आतंकवादी संघटना सहभागी असुन संपूर्ण जगात यांनी आपले जाळे विणले आहे.त्यामुळे भारत आतंवादी संघटनांसोबत कधीही समझोता करणार नाही.अफगाणिस्तान मधील पुढील तालीबान्यांची भुमिका काय आणि कितपत कारगर राहील या संपूर्ण बाबींचा विचार करूनच भारत पुढे पाऊल टाकेल.त्यामुळे भारतातील तालीबान समर्थकांनो जरा सबुरी ठेवा जास्त उतावीळ होऊ नका.जास्त उतावीळ व्हाल भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही.आजही हजारो अफगाण नागरिक काबुल हवाई अड्यावर अडकून पडले आहेत व त्यांचा जीव धोक्यात आहे.त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक देश सामोर येत आहे.अशा परिस्थितीत तालीबान्यांना चांगले म्हणनाऱ्यानी सावध रहावे पाहिजे.कारण सध्याच्या परिस्थितीत तालिबान्यांकडुन होत असलेले अत्याचार पहावल्या जात नाही.अफगानिस्तान मधील घटना पाहून अंगावर शहारे येतात.अफगानिस्ताणमध्ये तालीबान्यांची सरकार बसेलच याची काहीच गॅरंटी नाही.कारण सध्याच्या परिस्थितीत तालीबान्यांनी अफगाणिस्तानला कंगाल केले असून भिकेला लावले आहे.आताही पंजशीरमध्ये “नार्दर अलायंसच्या” हातुन तालीबाण्यांना हार मानावी लागली.यात तालीबानचे ३०० लडाके ढेर करण्यात आले.तालीबानी गेल्या २५ वर्षांपासून पंजशीर वर कब्जा करण्याच्या तयारीत होते.परंतु पंजशीर खोरे इतिहासात कधीही कोणत्याही परदेशी आक्रमकाला जिंकता आले नाही.नव्वदच्या दशकात अहमदशहा मसूद रशियन सैन्याच्या विरूध्द लढणारा अफगाण टोळीचा योध्दा होता.त्याला अफगाण मुजाहिदीनांनी “पंजशीरचा सिंह” अशी उपाधी दिली होती.९ सप्टेंबर २००१ ला अलकायदा या आतंकवादी संघटनेने आत्मघातकी स्फोटाव्दारे त्याची हत्या करण्यात आली.यानंतर अहमदशहा मसूदचा मुलगा “अहमद मसूद”यांनी पंजशीरची धुरा सांभाळली.त्यामुळे इतिहास आहे की पंजशीरकडे तिरप्या नजरेने पहाण्याची हिंमत कोणीही करू शकले नाही.त्यामुळे इथे जर तालीबान्यांनी पुन्हा शिरकाव केला तर त्यांची पराज अटळ आहे.पंजशीरचे सुरक्षा कवच अबाध्य आहे त्यामुळे परकीयांच्या हाती पंजशीर अजून पर्यंत लागलेले नाही.तालीबाण्यांना ताजीक वंशाचे अहमशहा मुसुद यांनी अनेकदा तालीबान्यांना जोरदार टक्क दीली आहे.त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून तालीबान पंजशीरवर कब्जा करून शकला नाही.परंतु तालीबाण्यांना ही बाब माहीत आहे की पंजशीर शिवाय अफगाणिस्तानवरील कब्जा अधुरा आहे.त्यामुळे तालीबानचे ६ हजार लढाके पंजशीरवर चालुन गेले.परंतु अहमदशहा मसुदचा मुलगा अहमद मसुदने सध्या पंजशीरचा मोर्चा सांभाळला आहे.याला साथ देत आहे अफगाणिस्तानचे अनेक सैनिक.त्यामुळे आता तालीबानला पंजशीर मिळने कठीण आहे.त्यामुळे भारतात कोणीही तालीबानचे समर्थन करू नये.तालीबानी हे अमेरिका, रशिया, चीन यांची कटपुतली आहे त्यामुळे हे कोणाचेच होवु शकत नाही.पजशीरने तालीबानला चेतावणी दिली की “जिंदा रहना है तो अफगाणिस्तानसे भाग जावं” वरना मारे जावोंगे.अशी डरकाळी अहमद मसुदने फोडली आहे.त्यामुळे तालीबानी घाबरलेले दिसतात.अफगाणिस्तानमध्ये जर तालीबानची सरकार स्थापन झाली तर संपूर्ण मंत्रीमंडळामध्ये आतंकवादी मंत्री दीसेल.अशा तालीबान्यांना भारत कधीच मदत करणारा नाही.त्यामुळे भारतातील तालीबान समर्थकांनो याद राखा की तालीबानी हे आतंकवादीच आहे यांच्यात अजून पर्यंत मानुसकी आलेली नाही.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
Leave a Reply