ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सोमंथळी येथे ओढ्याच्या पुलावरून टँकर पलटी

July 15, 202215:13 PM 14 0 0

फलटण सई निंबाळकर – फलटण बारामती महामार्गावरील सोमंथळी येथील करंज ओढा पुलावरून श्रीमंत रामराजे मोटर वाहतूक सहकारी संस्था गोविंद दूध वाहतूक करणारी टँकर MH१० AQ २५९९ चालकाचे टॅंकर वरील नियंत्रण सुटले टॅंकर दोन पलटी घेऊन ६० फूट खोल ओढ्या मध्ये कोसळल्यानंतर परिसरातील एकच हलकल्लोळ माजला सोमंथळी परिसरातील नागरिकांनी मदतीची धाव घेऊन पलटी टँकरमधील चालक व केमिस्ट यांना सुखरूप बाहेर काढून गंभीर जखमी झालेल्या ड्रायव्हर केमिस्ट ला फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

फलटण -बारामती महामार्गावरील सोमंथळी परिसरातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम काज पूर्णता झालेले नाही वाढती रस्त्या वरील वाहतूक पाहता सोमंथळी परिसरातील रस्त्याची रुंदी फार कमी आहे दोन चार दिवसाला छोटे-मोठे अपघात सोमंथळी परिसरामध्ये पाहावयास मिळतात सोमंथळी गावातून सांगवी शाळेला जाणारे मुलांची संख्या ७०/७५ टक्के असून ४० टक्के मुलं सायकलीवर जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पहावयास मिळतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमंथळी परिसरातील रस्ता रुंदीकरणाची दखल न घेतल्यास सोमंथळी ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *