ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजप सांस्कृतिक सेलतर्फे शिक्षकाचा सत्कार

September 7, 202113:40 PM 9 0 0

जालना:.५ सप्टेंबर शिक्षक दिन.भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलतर्फे हा शिक्षक दिन थोड्या वेगळ्या स्वरुपात घेण्यात आला.सत्कारमूर्ती म्हणून फक्त शाळेतले शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक न घेता वेगवेगळे शिक्षक म्हणजे क्रिडा,नृत्य,योगा,टंकलेखन,संगीत,मूकबधीर शाळेत शिकवणारे,चित्रकला,आणि दोन खाजगी शिकवणी घेणारे पण शैक्षणिक क्षेत्रात 100% निकाल देणारे असे सगळे शिक्षक निवडले होते.

ह्यातले सगळे शिक्षक आपआपले विद्यार्थी तळमळीने,घडविणारेच आहेत.मुख्य म्हणजे प्रसिद्धी,आणि झगमगाटापासून दूर राहून आपले ध्येय,कर्तव्य ,निष्ठा,तत्व जोपासून काम करणारे आहेत.सांस्कृतिक सेलच्या वतीने सत्कार केल्यावर आमच्या कार्याची दखल घेतली म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.हा सत्कार..श्रीमती वासाडीकर मॕडम, सौ.ज्योती देशपांडे,( संगीत)श्री.रविंद्र शेटे,सौ.गौरी दशरथ( योग शिक्षक )श्री.सुनील कुलकर्णी ,श्री.सुब्रम्हण्यम अय्यर( टायपिंग इनस्टिट्युट)श्री.संतोष जोशी ( चित्रकला) श्री.विक्रांत चिरकलवार ( क्रिडा.बॕडमिंटन कोच) सौ.विद्या राव ( शास्त्रीय नृत्य) श्री.गन्द्रे सर( मूकबधीर विद्यालय ) श्री मधुकर गायकवाड( नाथानी हायस्कुल,अंधश्रद्धा निर्मूलन ,पर्यावरण संवर्धन ह्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य) सौ.अंजली बडवे ,कु.सोनाली म्हारोळकर(खाजगी शिकवणी शिक्षक )…एवढ्या शिक्षकांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.सांस्कृतिक सेलच्या वतीने सौ.शुभांगी देशपांडे जिल्हाध्यक्ष, सौ.अरुणा फुलमामडीकर,सौ.दिपा बिनिवाले,सौ.सुलभा कुलकर्णी ,सौ.आनंदी अय्यर,सौ.अपर्णा राजे,सौ.संपदा कुलकर्णी ,सौ.जान्हवी वैद्य ह्या उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *