ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक:- अमृत रसायन

September 2, 202113:52 PM 75 0 0

गुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिलै न मोष।
गुरु बिन लखै न सत्य को, गुरु बिन मैटैं न दोष
संत कबीरांनी आपल्या दोह्यातुन गुरूंच महात्म्य विशद करतात…गुरू शिवाय जगण्याला आकार प्राप्त होत नसतो जगण्याची जीवनाची दिशाहीन असलेली वाटचाल गुरूच्या यथोचित मार्गदर्शनाने मार्गस्थ होते.. चरिञ आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारे मुलगामी माध्यम म्हणजे शिक्षण,आणि त्याचा मुर्तीमंत अविष्कार म्हणजे शिक्षण आणि विद्यार्थी होय..
शिक्षक एकाच बागेत विभिन्न रूप आणि रंगाचे फुलं सजवणार्‍या माळ्याप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात शिक्षा पोहचवण्या प्रयत्न केला जात आहे. आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात..म्हणुन या पेशाला एक आदर्श आणि सुमन अंतःकरणाने पाहिले जाते..
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवस डाॅ. राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी अत्यंत आदरभाव होता त्यांना शिक्षकांविषयी असणारी आस्था हीच या दिवसाची पुण्याई जे की समग्र शिक्षकांचा खरा सन्मान व्हावा या हेतुने राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांचा जन्मदिवस हे शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्याच्या
च्निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘गुरु’ यांचे प्रत्येकाच्या जीवनातमहत्त्व असतं.
मात्र मागील एक वर्षात कोरोनाने हाहाकार मागवल्या शिक्षणाचे सगळेच चित्र पालटल्याचे पाहायला मिळाले…
कोरोनाने जीवघेणी घेतलेली स्पर्धा आणी त्यात आपण सगळे लढाऊ ठरलेले स्पर्धक कसेबसे यातुन कुठे हरलो कुठे सावरलो…
शाळा,शिक्षक,विद्यार्थी या ञिसुञीची किमयाच न्यारी जीवनाची भागीदारी…
योग्यवेळीेला मिळालेले योग्य मार्गदर्शन हे जीवन उन्नयनाचे प्रगामी साधन असते…
सध्याच्या परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही *शाळा* पुनः बोलकी होण्याच्या प्रतिक्षेत आहेत..मुलांचे आनलाईन क्लासेस त्यात येणारे तामसिक व्यत्यय वाटते बाल मानसिकता,वातावरण वगैरे अश्या कित्येक घटकांचा परिणाम मुलांवर,तसेच पालक समवेत शिक्षकांवर होताना दिसत आहे…
तरीही. वि.दा. करंदीकरांच्या ओळी आठवतात
असे जगावे दुनियेत मध्ये आव्हानाचा लावुन अत्तर
नजर रोखीने नजरेच्या आयुष्याला द्यावे उत्तर…

हे साहस,संयम,शहाणपण बाळगून विपरीत परिस्थिती शीर्षक दोन हात करत…
या काळाशी लढुया. ..
हेच सामर्थ्य जिवंत ठेवणारे अमृत रसायन म्हणजेच शिक्षण आणि त्याचा पालनकर्ता शिक्षक…जो की प्रत्येक क्षेञातील खनिजांना उजागर करतो…
म्हणूनच
हिम्मत द्या थोडी
उसळू द्या रक्त
पैसा बिसा नको
दफ्तर द्या फक्त….

ज्या कलमाने जीवनमान बदलवण्याचे बळ, सामर्थ्य या शिक्षणात,शिक्षकांत आहे….
तोच तर समाजनिर्मितीचा महत्वाचा आधारस्तंभ..
ज्याच्या लेखणीतून हजारो दिप प्रज्वलित होऊन हे
विश्व शिवनेरी करतात..अशा समग्र शिक्षक वर्गांना हा लेख समर्पित आणि शिक्षण शिक्षक दिनाच्या शिस्तबद्ध,क्षमाशील, कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी शिक्षकाला आदरयुक्त नमन💐🙏 शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

प्रा. सारीका बकवाड

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *