आला आला कोरोना आला
ऑनलाईन शिक्षणाचा पैगंम घेऊन आला
लॉकडाऊन चा कंटाळा आला
शाळा उघडणेचा ध्यास मनी लागला!
पहिलं पहिलं वाटत होतं
व्हिडीओ आणि अडिओ च प्रेम
ऑनलाईन शिक्षणाचं अभ्यास च
छानसं शिक्षण रुपी फ्रेम
नाही राहिलं हो त्याचं कसलेच भान
शिक्षकांनी शिक्षणासाठी केलेली जाण!
मोबाईल वर्गाचं प्रथम दर्शी
केले खरं स्वागत…
ऑनलाईन शिक्षणाला दिला खरं दुजोरा
पण…. आता…
ऑनलाईन आणि मोबाईल रेंज
यांचा मेळच नाही हो लागत!
जीव पणाला लावून
शिक्षकांनी केली खरी
ऑनलाईन शिक्षणाची धुरी
विविध उपक्रम व शिक्षण पद्धतीचा
वापर करून दिला ऑनलाईन वर्गाला दुजारा
पण….पण.…रेंजच्या आणि मोबाईलच्या
झटपटीत माझी शाळाच बरी!
नको निर्जीव भावनांचा खेळ
नको विद्यार्थी पासून लांब राहण्याची खेळी
ऑनलाईन ते ऑनलाईन च हो
समक्ष शिक्षण चं हीच खरी आयुष्यची दौलत…!
शाळेत येतो मास्क घालून
सॅनिटायजर चा करतो वापर
काळजी घेतो सोशलडिस्टिंग ची
पण आयुष्यच्या वळणावर
ऑनलाईन शिक्षणापेक्षा माझी शाळाच बरी!
झोपडपट्टी, गरिबांची मुले माझ्या
शाळेच्या दारी
नाही सोसवत मोबाईल रिचार्ज चा
बोज भारी
कोरोना काळात अन्न मिळण्याची
खंत न्यारी
हाती नाही पैसा अडका
पालकांच्या दारी
मिळावा कोरोना पासून दुनियेत
सुटकेचा अंत!
दुवा मिळावा दैवापासून
कोरोनाच्या सुटकेचा निश्वास
विद्यार्थी यावा दारी
माझ्या जि. प. शाळेच्या मोफत
शिक्षणाच्या मार्गी
लख लख उजळू दे त्यांच्या
जीवनाची कायमची घडी
खरंच च देवा
कोरोना पासून मिळू दे
सगळ्यांना च मुक्ती
देवा सगळ्याचं मुक्ती!
सौ .वर्षा गायकवाड
शाळा सुरूपखान वाडी ,
तालुका -माण
Leave a Reply