ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठी भाषेचा पाया शिक्षक व पालक मजबूत करु शकतात – गंगाधर ढवळे

February 5, 202215:13 PM 30 0 0

नांदेड – मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात येणार असल्याचा शासनाचा विचार स्वागतार्ह आहे. हा प्रत्येकाच्याच मनातला विचार आहे, परंतु मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनासोबतच शिक्षक आणि पालकांनीही एक नैतिक कर्तव्य म्हणून तसेच भाषाभिमान म्हणून लहान वयातच मराठीची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येथील प्रतिथयश साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. यावेळी जवळा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सरपंच साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, मिलिंद गोडबोले, मराठी भाषा विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर यांची उपस्थिती होती.
ग्रामीण बोलीभाषा बालविकास शालेय समिती आणि मराठी भाषा संवर्धन नागरिक मंचाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मातृभाषा विकासात शिक्षक व पालक यांची जबाबदारी’ या विषयावर भाष्य करण्यासाठी ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, लहान मुलांची पहिली भाषा ही मातृभाषाच असते. या वयातच मराठी भाषेचा पाया मजबूत करण्यासाठी , तसेच मातृभाषेतून शिक्षण व महत्व समजावून देण्याचे काम प्रभावीपणे पालक आणि शिक्षक चांगल्या प्रकारे करु शकतो. सद्या इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले आहे. त्याचे प्रचंड आकर्षण पालकांना आहे. इतर भाषा शिकणे अथवा ज्ञान मिळवणे वाईट नाही परंतु मातृभाषा ही तेवढीच महत्त्वाची असून त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे प्रासंगिक उद्घोषक आनंद गोडबोले यांनी केले. प्रास्ताविक जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी.एस. यांनी मांडले तर आभार संतोष अंबुलगेकर यांनी मानले. यावेळी बाबुमियाँ शेख, सुभाष शिखरे, गुणवंत गच्चे, मारोती चक्रधर, चांदू झिंझाडे, विलास गोडबोले, भीमराव गोडबोले, सुनील पंडित, संतोष घटकार, संजय कांबळे, नामदेव पांचाळ, बालाजी झिंझाडे, रमेश कदम, हैदर शेख यांच्यासह बालक बालिका उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *