ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इनरव्हील क्लब ऑफ जालना ( HORIZAN) यांचे वतीने शिक्षकांचा गौरव

September 6, 202115:28 PM 6 0 0

जालना.(अनिता पवार) इनरव्हील क्लब ऑफ जालना ( HORIZAN) यांचे वतीने शिक्षक दिनानिमित्त आज दि.५ सप्टेंबर २o२१, रविवार रोजी जि.प.प्रा.शा. गोकुळवाडी केंद्र -जामवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरवान्वित करण्यात आले. यात, महिला शिक्षकांची संख्या अधिक होती, हे विशेष 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ जालनाच्या अध्यक्षा नेत्रा भक्कड तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.जयमंगल जाधव (जिल्हा परिषद सदस्य ) तसेच जालना व बदनापूर तालुका जि.प. शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. मंगेश जैवाळ आणि इनरव्हीलच्या इतर पदाधिकारी हे उपस्थित होते.*
समन्वयक श्री. सुनील ढाकरके सर यांचे पुढाकाराने संपन्न झालेल्या या समारंभात स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. व श्री. उमेश काळे या उभयतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महिला आघाडीच्या श्रीमती डॉ. शिवनंदा मेहेत्रे, श्रीमती सुरेखा ताटीकोंडा, श्रीमती कल्पना पन्हाळे, श्रीमती मनिषा शिंदे, श्रीमती साधना गिऱ्हे, श्रीमती संजीवनी वाघमारे-राऊत, श्रीमती सीमा कुलकर्णी, श्रीमती शुभांगी कुमठेकर, श्रीमती सुनीता डहाळे, श्रीमती नंदा कदम, श्रीमती स्वाती पाटील, तसेच शिक्षक परिषदेचे सर्वश्री दिपक पाटील, नागेश मगर यांसोबत अन्य शिक्षकांचा समावेश होता.
याप्रसंगी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे श्री. सिद्धार्थ गजभिये, शिक्षक संघाचे श्री.ओमप्रकाश देशमुख, शिक्षक परिषदेचे श्री. जगन्नाथ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शा. गोकुळवाडीचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत हिरे, सहशिक्षक श्री. संजय जाधव यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा. महिला आघाडी, जालना यांचेकडून मिळाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *