ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिकवण संतांची- संत कबीरदास

June 25, 202113:29 PM 112 0 1

कबीरदास भारतातील एक महान कवी, हिंदी साहित्याचे विव्दान आणि समाजसुधारक होते. भारतीय धर्म, भाषा व संस्कृती संवर्धनामध्ये संत कबीरदासजींचे नाव सर्वात वर घेतले जाते कारण कबीरदासजींनी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन भारतीय संस्कृतीचा प्रसार प्रचार केला आहे. या व्यतीरीक्त त्यांनी जीवनाशी निगडीत जे उपदेश केले आहेत त्यांना आत्मसात करून आपण आपले जीवन आदर्श बनवु शकतो.

संत कबीरांच्या दोहयांच्या माध्यमातुन सकारात्मकता वाढते व जीवनात यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्याला एक आत्मविश्वास मिळतो.
संत कबीरांनी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.
“जिन खोजा तिन पाइया गहरे पानी पैठ मैं बपुरा बूडन डरा रहा किनारे बैठ” संत कबीर म्हणतात… प्रयत्न करणाऱ्याच्या हाती काही न काही येतेच त्याचे प्रयत्न वाया जात नाहीत एखादा गोताखोर पाण्यात खोल गेल्यानंतर काही नं काही घेऊन वर येतोच…परंतु काही माणसं अशीही असतात जी बुडण्याच्या भितीने पाण्यात उतरतच नाहीत किनाऱ्यावर बसुन राहातात. त्यांच्या हाती काहीही येत नाही.


कबीरांच्या दोहयां मधून त्यांनी गुरुची महती सुंदर वर्णिली आहे. स्वामी रामानंदांना त्यांनी आपला गुरू बनविले. एकदा संत कबीर पंचगंगेच्या घाटावर पायऱ्या उतरतांना पडले त्याच वेळी स्वामी रामानंद स्नानाकरता नदीच्या पायऱ्या उतरत होते त्यावेळी स्वामी रामानंद यांचा पाय कबीरांवर पडला, कबीरांच्या तोंडुन त्यावेळी राम राम निघाले. त्या राम शब्दाला कबीरांनी आपला दिक्षा मंत्र मानला आणि रामानंदांना आपला गुरू मानले. कबीर म्हणतात…
‘हम कासी में प्रकट भये हैं रामानंद चेतायें।’
संत कबीरांना अनेक भाषांचे ज्ञान होते. साधु संतांसमवेत ते कित्येक ठिकाणी भ्रमण करीत असत त्यामुळे त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत झाले होते. ते आपले विचार
व्यक्त करण्याकरता स्थानिक भाषेमधील शब्दांचा वापर करत असत. आपल्या स्थानिक भाषांमधुन लोकांना समजावीत आणि उपदेश करत. ते दोह्यांच्या माध्यमातुन विविध उदाहरणं देत आपल्या विचारांना लोकांच्या अंतरमनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत.
कबीरांनी गुरू ला कुंभाराचे उदाहरण देत सांगीतले आहे की ज्याप्रमाणे कुंभार अतिशय सुबकतेने एखादे मातीचे भांडे आकार देऊन घडवतो त्याप्रमाणे गुरू आपल्या शिष्याला उपदेशांनी आणि विचारांनी उत्तम घडवण्याचा प्रयत्न करतो. संत कबीर हे नेहमी सत्य बोलणारे निर्भय आणि निर्भीड व्यक्ती होते. कटु सत्य सांगतांना देखील ते मोठया धाडसाने सांगत असत. संत कबीरांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ते आपल्या निंदकांना स्वतःचा हितचिंतक मानायचे. कबीरांना सज्जनांची, साधुसंतांची संगत आवडत असे. कबीर म्हणतात…
“निंदक नियरे राखिये, आँगन कुटी छवाय। बिन पानी साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।”
कबीरांचे दोहे म्हणजे बदलाची प्रेरणा व समस्त मानवजातीला योग्य मार्गावर
चालण्याची प्रेरणा होय. अशा या महान संतास त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन
डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *