ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मनमानी कारभाला आणि हुकामशाहीला कंटाळुन तलाठी सामुहिक रजेवर

February 11, 202215:12 PM 48 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना येथील तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मनमानी कारभाला आणि हुकामशाही वागणुकीला कंटाळुन तलाठी सामुहिक रजेवर जात असून तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी दि. 09 फेब्रुवारी पासून सामुहिक रजेवर जात असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जालनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जालना यांना दिले आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्याकडुन योग्य वागणुकीची अपेक्षा असतांना ते त्या पध्दतीने वागत नसुन ते तलाठी व मंडळ अधिकारी यांचे हेतुपुरस्पर वरीप्ठांना चुकीचे प्रस्ताव पाठवणे, दबावतंत्र वापरणे, वारंवार कारवाईची धमकी देणे, पेन्शन न मिळू देण्याच्या धमक्या देणे, महिला कर्मचारी यांना अर्वाच्य भाषेत बोलणे अशा पध्दतीची वागणुक देत असून यामुळे सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे आरोग्य संदर्भाच्या समस्या निर्माण होत असून यांच्या मनमनी व हुकामशाही वागणुकीस सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे त्रस्त झाले असुन त्यांचे माणसीक संतुलन बिघडत असेल्याचे निवेदनात नमूद केले आहे. श्री भुजबळ यांच्या वागणुकीचे उदाहरण म्हणजे ए. बी. पुरी मंडळ अधिकारी यांची दलालामार्फत तक्रार घेऊन हेतुपुरस्पर विभागीय चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी जालना यांना ए. बी. पुरी मंडळ अधिकारी यांची शिस्तभंगाची (1 ते 4) चा प्रस्ताव पाठवुन त्यांना मानसिक, आर्थिक व नौकरी संपविण्याची भाषा करतात. एस. आर. जाधव, आय. बी. सरोदे व व्ही. बी. कणके यांचे पी. आर. जाधव, महसुल व महुसलोत्तर कामे चांगले असुनही त्यांची जाणीवपूर्वक वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव स्वत उविभागीय जालना यांच्याकडुन त्यांची इच्छा नसतांनाही वेतनवाढ बंद करुन घेतले. तसेच दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी तहलिसदार भुजबळ यांनी दुपारी 1.30 ते 2.30 च्या दरम्यान सरोदे तलाठी (तलाठी सजा सिरसवाडी) यांना मोबाईलव्दारे संभाषण “तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोरोना होवो किंवा मरु दया मी सांगीतलेले काम सोमवार पर्यंत झाले पाहिजे. नसता मी तुम्हाला पाहुण घेईन“ अशी धमकी देण्यात आली. “तहसीलदार भुजबळ यांच्या मनमनी व हुकामशाही वागणुकीस सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे त्रस्त झाले असुन त्यांचे माणसीक संतुलन बिघडत आहे. या त्रास्ताला कंटाळुन तलाठी व मंडळ अधिकारी यांचे बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार भुजबळ यांची राहील असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांची बदली करेपर्यंत सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकारी दि. 09 फेबु्रवारी 2022 रोजी पासुन सामुहीक रजेवर जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर एस. ए. घुगे, एम. आर. निकम, जि. डी. मगरे, बी. आर. कांगणे, एस. गुल्लापेल्ले, आर. पी. खंडागळे, श्री. एन. एस. शिरभाते, डी. जी. गिरी यांच्यासह तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तहसीलदारांना निलंबीत करून कारवाई करावी
भिम आर्मी संघटने जिल्हा प्रमुख सुभाष दांडेकर यांची मागणी
जालना येथील तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मनमानी कारभाला आणि हुकामशाही वागणुकीला कंटाळुन जालना तालुक्याचे सर्वच तलाठी दि. 09 फेब्रुवारी पासून सामुहिक रजेवर गेले आहे. तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना नाहक त्रास देणारे तहसीलदार श्री भुजबळ यांना निलंबीत करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिम आर्मी संघटनेचे जिल्हा प्रमुख सुभाष दांडेकर व महिला प्रमुख रंजनाताई जाधव यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *