ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फाल्गून पौर्णिमेनिमित्त दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर १८ मार्चपासून

March 15, 202113:13 PM 72 0 0

नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव येथे येत्या १८ मार्चपासून श्रामणेर शिबिरास प्रारंभ होणार आहे. हे शिबिर फाल्गून पौर्णिमा २८ मार्च पर्यंत चालणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.

शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रादुर्भावामुळे समाज व समुह संपर्क तोडणे आवश्यक आहे. दहा दिवस श्रामणेर म्हणून बौद्ध जीवन, दिनचर्या जगत असतांना आपोआपच समुह संपर्क टाळल्या जाणार आहे. तसेच केंद्र व केंद्र परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम काटेकोरपणे पालन केले जाणार आहेत. दहा दिवसाच्या या शिबिरात भदन्त पंय्याबोधी थेरो, भदन्त सत्यशील महाथेरो, भंते संघरत्न, भंते चंद्रमुनी, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रध्दानंद, भंते सदानंद,भंते सुनंद, भंते शीलरत्न,भंते सुमेध, भंते सुभद्र भंते शीलभद्र हे शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.‌ इच्छुकांनी ८३०८८८७९८८ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *