ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना-अंबड रोडवर भिषण अपघात; एक ठार तर एक गंभीर जखमी

July 25, 202111:14 AM 94 0 0

जालना-अंबड रोडवर यशवंत नगर पेट्रोलपंपासमोर ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत एका मोटारसायकल चालकाचा जागीच चेंदामेंदा झाल्याने मृत्यु झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्र्यंबक जटळ असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.

ही घटना दि. 24 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक क्र. एम.एच.28 बी. 8946 च्या चालकाने भरधाव वेगात ट्रक चालवून दुचाकी क्र. एम.एच.21 ए.ई. 9577 ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालातर एक महिंला गंभीर जखमी झाली. या अपघाताची माहिती जि.प.सदस्य सतिष टोपे यांनी तालुका जालना पोलीसांना दिली त्यानंतर त्यांनी तात्काळ 108 नंबरच्या रुग्णवाहीकेस बोलावले. यावेळी सेवा निवृत्त ए.एस. आय. पोलीस अधिकारी एम.यु.पठाण यांनी देखील तात्काळ मदतकार्य सुरु केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. वडते, खाडे यांनी पोलीस कर्मचारी शिंदे, गाडेकर, मेहेर, मोरे, जारवाल, चव्हाण यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाला रुग्णवाहिकेत टाकून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवीला तर गंभीर महिला रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतरका गंभीर होता की, ट्रकच्या चाकाखाली दुचाकीचा आणि दुचाकी चालकाचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. ठेकेदारानी रोडवर कुठेही दिशादर्शक बोर्ड न लावल्याने हे अपघात होत असल्याच्या प्रतिक्रीया नागरीकातुन व्यक्त केल्या जात आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *